मलकापूर : दोन दिवसापुर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे मलकापूर (Malkapur) तालुक्यातील अनुराबाद, झोडगा व हरसोडा ई. गावात पिकांची व राहत्या घरांची मोठ्या प्रमाणवर नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आज सदर नुकसानग्रस्त भागाची स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह (Revenue and Agriculture Officers) पाहणी करून नुकसानी बाबत ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करुन मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना धीर दिला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
राज्यात मागच्या आठ दिवसात अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी मदत जाहीर करा असं मागणी सरकारकडं करत आहे. सध्या सरकारी अधिकाऱ्यांकडून नुसती पाहणी सुरु असून त्यानंतर मदत केली जाणार आहे. रबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये द्राक्षांच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत.
अवकाळी पावसामुळं आडवी झालेली पीकं कुजायला सुरुवात झाली आहे. आडव्या पडलेल्या पीकात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. परंतु हाता तोंडाशी आलेलं पीक खराब झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अवकाळी पाऊस अजून काही दिवस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
त्यावेळी रक्षा खडसे यांच्यासोबत माजी जि.प.सदस्य श्री.विलास पाटील, तालुकाध्यक्ष श्री.संजय काजळे, कृषी सहाय्यक श्री.नमायते, मंडळ अधिकारी श्री.काळवाघे, झोडगा ग्रामसेवक ममता दाबेकर, तलाठी श्री.चौहान, कृषीसेवक श्री.सावकारे, कृषी अधिकारी श्री.वानखेडे, ग्रामसेवक हरसोळा श्री.हिवाळे, सरपंच अनुराबाद श्री.ज्ञानदेव ढगे, उपसरपंच श्री.निलेश फिरके, झोडगा सरपंच श्री.निलेश फिरके, पान्हेरा सरपंच श्री.राजेश तायडे, श्री.कडू कोंगले, श्री.संदीप भोळे, श्री.दिपक फिरके, श्री.अतुल नारखेडे, श्री.समीर नारखेडे, श्री.निलेश नारखेडे, श्री.विश्वनाथ नेमाने, श्री.विश्वनाथ ढगे, श्री.संजय फिरके, श्री.संदीप लोखंडे, श्री.शिवाजी ढगे, श्री.एकनाथ शेलकर, श्री.संदीप उदेकार, श्री.तेजराव राईपुरे, श्री.अनिल रायपुरे, श्री.शेषराव रायपुरे, श्री.मुरलीधर तुरक ई. इत्यादी लोकांची उपस्थिती होती.