शेतकरी उत्पादक कंपन्यामुळेच भारत बाजरी उत्पादनात जगाच्या केंद्रस्थानी, केंद्र सरकारचे कंपन्यांना पाठबळ

| Updated on: Feb 20, 2022 | 3:59 PM

देशात शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या जशी वाढत आहे त्याचप्रमाणे या कंपन्यांचा फायदा देखील शेती उत्पादन वाढीसाठी होत आहे. सध्या भारतामधील बाजरीची बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. या संबंध प्रक्रियेत शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका महत्वाची राहत आहे. बाजरीच्या निर्यातीमध्ये भारताचा जगात पाचवा क्रमांक लागत असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यामुळेच भारत बाजरी उत्पादनात जगाच्या केंद्रस्थानी, केंद्र सरकारचे कंपन्यांना पाठबळ
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : देशात शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या जशी वाढत आहे त्याचप्रमाणे या कंपन्यांचा फायदा देखील (FPO) शेती उत्पादन वाढीसाठी होत आहे. सध्या भारतामधील (Bajra crop) बाजरीची बाजारपेठ ही (Global Market) जागतिक बाजारपेठ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. या संबंध प्रक्रियेत शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका महत्वाची राहत आहे. बाजरीच्या निर्यातीमध्ये भारताचा जगात पाचवा क्रमांक लागत असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दुबई येथे झालेल्या प्रदर्शनात अन्न शेती आणि उपजीविका या विषयावर चर्चा पार पडली. या दरम्यान, कृषी क्षेत्रातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञांनी भारतीय उद्योग जगतातील बड्या देशाची निर्यात क्षमता वाढविण्याच्या संधींबाबत विचारविनिमय केला. स्टार्टअप्स आणि शेतकरी उत्पादक संघटनांनी बाजरीची मूल्य साखळी वाढविण्यास मदत करावी, जेणेकरून केवळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संपर्क साधता येईल असे आवाहान कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलक्ष लेखी यांनी केले.

उत्पादक कंपन्यांनी आपले धोरण निश्चित करावे

बाजरीबाबतचे उत्पादन आणि त्याचे फायदे काय आहेत हे सर्व जगासमोर आणण्याची क्षमता आता भारत देशामध्ये आहे. वाढीव उत्पादनाबरोबर तंत्रज्ञानाचाही यामध्ये फायदा होत आहे. शेतकरी उत्पादक संस्था आणि स्वयंसहाय्यता गटांना असंघटित अन्न प्रक्रिया प्रणाली औपचारिकपणे देण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी तांत्रिक सहाय्य, क्रेडिट लिंकेज आणि सहकारी संस्था प्रदान करणे आवश्यक आहे जे अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी पुरेशी साठवण क्षमता सुनिश्चित करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक सी. आनंदरामकृष्णन यांनी सांगितले आहे.

हे आहेत बाजरीचे फायदे

आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे ओचित्य साधून बाजरीचे पोषण फायदे आणि मूल्य साखळी बाहेर आणून त्याला गती देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचे कृषी मंत्रालयाच्या सहसचिव शुभा ठाकूर यांनी सांगितले आहे. बाजरीच्या पौष्टिक सुरक्षिततेचे पैलू स्पष्ट करताना न्यूट्रीहबचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. दयाकर राव म्हणाले की, बाजरीचे अनेक फायदे आहेत. हे येथील लठ्ठपणा आणि कुपोषण दूर करण्यासाठी उपयुक्त सिद्ध होऊ शकते. हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोकेमिकल्सचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि उच्च रक्तदाब, पोटाचा कर्करोग आणि हृदयाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. हे मानवी शरीरात असलेले ट्रायग्लिसेराइड्स कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अनेक आजार बरेही होतात.

संबंधित बातम्या :

शेती उत्पादनवाढीसाठी ‘जीएम’ वाणांशिवाय पर्याय नाही, काय आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ठिबक संच बसवला आता अुनदानही खात्यावर होणार जमा, लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

काय आहे ‘गाव गोदाम योजना’..? ग्रामपंचायतींना उत्पन्न अन् शेतकऱ्यांना कसा होणार लाभ? वाचा सविस्तर