बीड : गेल्या दोन दिवसांमध्ये ऊसाला आग लागल्याच्या घटना (Marathwada) मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. या घटनांमधील अधिकच्या घटना ह्या विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीतून घडल्याचे समोर आले आहे. रविवारी लातूर आणि औरंगाबाद येथील टेम्भापूरी येथेही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. यामुळे महावितरणकडून काही आर्थिक मदतही मिळेल असा आशावाद या (Farmer) शेतकऱ्यांना आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच आकसापोटी तोडणी आलेल्या (Sugarcane Fire) ऊसाला काडी लावल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे चंद्रकांत बुरगे यांचे नुकसान तर झालेच आहे पण ही कसली दुश्मनी असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकासान झाले आहे. अधिकच्या पावसाचा केवळ ऊस या नगदी पिकावरच परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे ममदापूर येथील चंद्रकांत बुरगे यांना यातूनच अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा होती. शिवाय आता काही दिवसांमध्ये ऊस तोडणी होऊन कारखान्यावर जाणार होता. मात्र, शेजारच्यानेच उभा ऊस पेटवून दिल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. आतापर्यंत अनावधनाने अशा घटना झाल्याचे समोर आले होते. पण आकसापोटी शेतकऱ्याच्या मेहनतीवर अशाप्रकारे पाणी फेरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. शिवाय खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तर आता रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. असे असताना आता केवळ ऊसाचाच आधार होता. शिवाय त्याचा कालावधीही पूर्ण झाल्याने ऊसाची तोड अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. मात्र, या कृत्यामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न देखील उपस्थित झाल्याचे शेतकरी चंद्रकांत बुरगे यांनी सांगितले आहे. मात्र, लगतच्या ऊसाच्या फडातील पाचट जाळताना हा प्रकार झाल्याचे शेजारच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचा नाद खुळा : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी अनोखी शक्कल, दुहेरी फायदा
Summer Season : उन्हाळी सोयाबीनचा नवा प्रयोग, कसा होईल यशस्वी?
रब्बी हंगामातील पिकांचे योग्य व्यवस्थापनच उत्पादनवाढीचा मार्ग, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?