शेतकऱ्यांना घामाचा दाम कधी मिळणार? ऊस बिलाचे चेक बाऊन्स, साखर कारखान्यांनी पैसे थकवले

| Updated on: Aug 10, 2021 | 1:28 PM

राज्यातील 2020-21 च्या ऊसाचा गळित हंगाम एप्रिल महिन्यात संपला. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवल्याचं समोर आलंय. तर, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलापोटी दिलेले चेक वटले नसल्याचं समोर आलंय.

शेतकऱ्यांना घामाचा दाम कधी मिळणार? ऊस बिलाचे चेक बाऊन्स, साखर कारखान्यांनी पैसे थकवले
ऊस
Follow us on

जालना: राज्यातील 2020-21 च्या ऊसाचा गळित हंगाम एप्रिल महिन्यात संपला. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवल्याचं समोर आलंय. तर, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलापोटी दिलेले चेक वटले नसल्याचं समोर आलंय. विविध जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची बिलं न दिल्यानंन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऊसाचं बील न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय.

शेतकऱ्यांचे पैसे पाच महिन्यांपासून थकवले

अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर शुगर्स, लातूर जिल्ह्यातील श्री साईबाबा शुगर्स शिवणी व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सचिन घायाळ शुगर या साखर कारखान्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोटींची देणी थकविली आहेत. विशेष बाब म्हणजे श्री साईबाबा शुगर्स या कारखान्याने शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात दिलेले धनादेश खात्यावर रक्कम नसल्याने वटले नाहीत. या सर्वच कारखान्यांची जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंतची ही देणी थकीत आहेत. ऊसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सुभाष रोटे, नारायण आमटे यांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ही ऊस बिलाची थकीत देणी न दिल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक सह संचालक कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना जालनाचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी ही माहिती दिली.

ऊस बिलासाठी स्वाभिमानीचं सांगलीतही आंदोलन

भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव साखर कारखान्याने 35 ते 40 कोटी शेतकऱ्यांचं ऊस बिल थकवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात आंदोलन केलं होतं. त्यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी ऊस बिल लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र , संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तासगाव मध्ये भव्य असा मोर्चा खासदारांच्या कार्यलयावर काढला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलांचे चेक वाटप करण्यात आलं होतं.

इतर बातम्या:

PM Kisan : पीएम किसान योजनेचे 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा

पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

Jalana farmers and Swabhimani Shetkari Sanghatana warning protest for due bills of sugarcane by sugar mills