Agricultural : अन्न-प्रकिया उद्योगामध्ये तरुणांना संधा, कृषी विभागाच्या योजनेचा असा घ्या लाभ

| Updated on: Jun 09, 2022 | 4:22 PM

उद्योगाच्या स्वरुपानुसार त्याचे अनुदान ठरविण्यात आले आहे. पॅकिजिंग, विपणन आणि ब्रॅंडिंगसाठी 50 टक्के अनुदान, कौशल्य प्रशिक्षण व भांडवल अनुदान प्रती बचत गटास 4 लाखाचे बीज भांडवल तसेच या योजनेतून उद्योग करणाऱ्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देता येणार आहे.

Agricultural : अन्न-प्रकिया उद्योगामध्ये तरुणांना संधा, कृषी विभागाच्या योजनेचा असा घ्या लाभ
अन्नप्रक्रिया उद्योग
Follow us on

मुंबई :  (Farm Production) शेती उत्पादन वाढीबरोबरच या व्यवसायातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी (Central Government) केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जात आहे. शेती व्यवसायातून उत्पादन आणि उत्पादनातून उद्योग असे सरकारचे धोरण आहे. शिवाय याकरिता शेतकऱ्यांना 10 लाखापर्यंतचे अनुदानही मिळणार आहे. 5 वर्षासाठी ही (Agri Scheme) योजना राबवली जात असून 2020-21 ते 2024-25 असा या योजनेचा कालावधी ठरविण्यात आला आहे. उद्योजकांच्या सोई करीता एक जिल्हा एक उत्पादन असे योजनेचे स्वरुप असले तरी इतर पिकांसाठी नविन प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी लाभ घेता येणार आहे.

अर्जासाठी कोण राहिल पात्र?

कृषी विभागाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ वयाची मर्यादा एवढीच अट ठेवण्यात आली आहे. 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या करिता ना शिक्षणाची अट आहे ना कुण्या कागदपत्रांची. शेतकऱ्यांबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकरी संस्था, निर्यातदार शेतकरी, स्वयंसहाय्यता बचत गट, शासकीय संस्था हे अर्ज करु शकणार आहेत.

असे मिळणार अनुदान

उद्योगाच्या स्वरुपानुसार त्याचे अनुदान ठरविण्यात आले आहे. पॅकिजिंग, विपणन आणि ब्रॅंडिंगसाठी 50 टक्के अनुदान, कौशल्य प्रशिक्षण व भांडवल अनुदान प्रती बचत गटास 4 लाखाचे बीज भांडवल तसेच या योजनेतून उद्योग करणाऱ्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देता येणार आहे. यासाठी तयार करावा लागणारा प्रकल्प आराखड्यासाठी संसाधन व्यक्तींची मदत होणार आहे .

हे सुद्धा वाचा

असा घ्या योजनेचा लाभ

शेतकरी किंवा संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून सर्व माहिती मिळणार आहे. एवढेच नाहीतर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी संसाधन व्यक्तीच्या मदतीने https;//pmfme.mofpi.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. शिवाय अडचण आल्यास कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.