कामधेनू दत्तक ग्राम योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोफत बियाणे व औषधे वाटप, कामधेनू योजना कोण राबवतं?, वाचा सविस्तर

| Updated on: Feb 21, 2021 | 5:03 PM

पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत काटी गावात कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा शुभारंभ करण्यात आला. Kamdhenu Dattak Gram Scheme

कामधेनू दत्तक ग्राम योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोफत बियाणे व औषधे वाटप, कामधेनू योजना कोण राबवतं?, वाचा सविस्तर
कामधेनू दत्तक ग्राम योजनेचे उद्घाटन
Follow us on

पुणे: कामधेनू दत्तक ग्राम योजनेमध्ये शेतकऱ्यांना मोफत मका बियाणे व औषधे वाटप करण्यात येते. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील काटी ही योजना राबवण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत काटी गावात कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या  शुभहस्ते योजनेचे उद्घाटन करण्यात आले. (Kamdhenu Dattak Gram Scheme know full details)

शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन

कामधेनू दत्तक ग्राम योजना उद्घाटनासाठी काटी गावचे सरपंच उपसरपंच तसेच पंचायत समिती इंदापूर पशुसंवर्धन विकास अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मका बियाणे, न्युडीफीड ,शुगरकेन, हे बियाणे मोफत वाटण्यात आले. गाईचे दूध वाढीसाठी कॅल्शियम, खनिजद्रव्य जंतुनाशक औषध, गोचीड औषध, मुरघास किट शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन तज्ज्ञांकडून मुरघास तयार करणे, गांडूळ खत तयार करणे, मुक्त संचार गोठा यांचे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले.

कामधेनू दत्तक ग्राम योजना कोण राबवतं?

कामधेनू दत्तक ग्राम योजना राज्यातील विविध जिल्हा परिषदांमार्फत चालवली जाते. पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा योजनेचा उद्देश आहे. गाई व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात येतेय. संबंधित गावामध्ये योजनाबद्धरीत्या पशुसंवर्धकविषयक कार्य मोहिमा हाती घेण्यात येतात.

योजनेअंतर्गत विभागाचे कार्य

जंतनाशके पाजणे, गोचीड- गोमाश्‍या निर्मूलन, वंध्यत्व निर्मूलन, लसीकरण शिबिरे इत्यादी कामे निवडलेल्या दत्तक गावांमध्ये एकत्रितरीत्या आयोजित केली जातात. कामधेनू दत्तक ग्राम योजना राबवण्याकरिता कालबद्ध कृती आराखडा सर्व संस्थांना देण्यात येतो. या योजनेचे दूधवाढीचे उद्दिष्ट लक्षात घेता योजना सुरू करतेवेळी शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरनिहाय दूध उत्पादनाची आकडेवारी घेण्यात येते. योजनेचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा दूधवाढीसंबंधी सर्व आकडेवारी घेण्यात येऊन नेमकी फलनिष्पत्ती काय झाली, याचा आढावा घेण्यात येतो.


संबंधित बातम्या:

मोदी सरकारच्या नव्या धोरणामुळे 70 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; जाणून घ्या…

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती, पाडवी बंधुंची लाखोंची कमाई

पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 100 जिल्ह्यात ड्रोनद्वारे पिकांची पाहणी, DGCA ची परवानगी

(Kamdhenu Dattak Gram Scheme know full details)