पुणे : उत्पादनाच्या दृष्टीने (Kharif Season) खरीप हंगाम महत्वाचा आहे. आणि यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा महत्वाचे पीक आहे. काळाच्या ओघात या दोन्ही पिकांच्या क्षेत्रफळात वाढ होत आहे. पण उत्पादनही वाढावे म्हणून आता (State Government) राज्य सरकराने एक वेगळे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आगामी 3 वर्षात या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढणार त्यादृष्टीने धोरण आखण्यात आले आहे. देशात प्रमुख पिकांच्या (Production) उत्पादकतेमध्येच घट आढळून येत आहे. त्यामुळे योग्य तंत्रज्ञानाचा वापर, शिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवण्यासाठी या विशेष कृती योजनेस 3 वर्षासाठी 1 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही मिळाली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे. शिवाय ज्या तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाची उत्पादकता कमी आहे त्यांची निवड करुन योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने कापूस आणि सोयाबीन ही पिके महत्वाची आहेत. त्यामुळे या पिकांचे उत्पादन वाढवायचे म्हणल्यावर विविध खते अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजूर निधी हा कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणासाठी वापरला जाणार आहे. तर 40 टक्के निधी मुल्यसाखळी म्हणजेच साठवणूक सुविधा, प्रक्रिया संच, क्लिंनिंग ग्रीडींग या बीबींसाठी वापरला जाणार आहे.
उत्पादनवाढीसाठी तालुक्यातील शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात तेच तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचवले जाणार, गावनिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना पीक प्रात्याक्षिके करुन दाखविले जाणार आहेत.शेती शाळा, क्षेत्रीय भेटी या माध्यमातून उत्पादन तंत्रज्ञान पोहचविले जाणार आहेत.