नवी दिल्ली: शेतकरी आणि शेतीची पार्श्वभूमी असणाऱ्यांसाठी मुऱ्हा म्हैस हे नावं नवं नाही. मात्र, जे लोक पशुपालन व्यवसायाशी संबंधित नाहीत त्यांच्यासाठी मुऱ्हा म्हशीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता कायम असते. मुऱ्हा म्हशीची किंमत शेतकऱ्यांना आणि इतरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरतो. मुऱ्हा म्हैस ही प्रामुख्यानं पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आढळते. दुग्धव्यवसाय करणारा प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे मुऱ्हा म्हैस असावी, अशी इच्छा असते. (know why Murrah Buffalo is so famous and also know about price and milk details)
पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांच्याकडे मुऱ्हा म्हैस असावी इच्छा असते कारण म्हशींच्या इतर जातींच्या तुलने मुऱ्हा जातीच्या म्हशी जास्त दूध देतात. मुऱ्हा म्हैसीची किमंत जास्त असण्याचं कारण त्यांची दूध देण्याची क्षमता असल्याचं समजलं जातं.
अधिक दूधासाठी प्रसिद्ध
मुऱ्हा म्हैस ज्या शेतकऱ्यांकडे असते त्यांची आर्थिक कमाई चांगली असते. मुऱ्हा जातीच्या म्हशी जास्त दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.या जातीच्या म्हशी इतर जातींच्या म्हशींपेक्षा अधिक दूध देतात. मुऱ्हा जातीची म्हैस साधारणपणे 15 ते 20 लीटर दूध देते. या जातीच्या काही म्हशी 30 ते 35 लीटर दूध देतात. मुऱ्हा जातीच्या म्हशीच्या दुधाला 7 किंवा त्यापेक्षा जास्त फॅट लागते. त्यामुळं शेतकरी मुऱ्हा जातीची म्हैस पाळण्यासा पसंती देतात.
शेतकऱ्यांचा म्हैस पाळण्याकडे कल
मुऱ्हा जातीच्या म्हशी आणि इतर म्हशी कोणत्याही प्रकारच्या वातावरणात त्या टिकू शकतात. मुऱ्हा जातीच्या म्हशींची शिंग वळलेली असतात. या म्हशी पंजाब आणि हरियाणा राज्यासह देशातील इतर भागातही आढळतात. हरियाणामध्ये मुऱ्हा जातीच्या म्हशींना काळं सोनं म्हटलं जाते. मुऱ्हा म्हशीची किमंत 1 लाखांपासून 3 ते 4 लाखांपर्यंत असते. काही ठिकाणी म्हशींची विक्री 50 लाखांपर्यंत होते. अलीकडच्या काळात म्हशींची खरेदी विक्री ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं देखील होत आहे.
गाय म्हैस विकायचीय, विकत घ्यायचीय, मग ही वेबसाईट आहे ना! शेतकऱ्यांनो ट्राय करा! https://t.co/YBNUYVKwou @nstomar @dadajibhuse #agriculture #animals #onlinetrading
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या:
गाय म्हैस विकायचीय, विकत घ्यायचीय, मग ही वेबसाईट आहे ना! शेतकऱ्यांनो ट्राय करा!
(know why Murrah Buffalo is so famous and also know about price and milk details)