शेतीच्या कामासाठी मजूर मिळेनात, रखरखतं उन्हं सहनही होईना आणि सांगताही येईना

| Updated on: Apr 03, 2023 | 3:14 PM

नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गव्हाची काढणी अंतिम टप्प्यावर आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गव्हाची पेरणी केली जात असते, मात्र जिल्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मोठ्या प्रमाणावर गव्हाचं नुकसान झालं आहे.

शेतीच्या कामासाठी मजूर मिळेनात, रखरखतं उन्हं सहनही होईना आणि सांगताही येईना
cotton
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) ग्रामीण भागात (Rural Area) कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाल्याने पांढरे सोने अजूनही शेतातच पडून आहे. नांदेडच्या लोहा, कंधार आणि मुखेड तालुक्यातील बहुतांश मजुरांचे पुण्यामुंबईला स्थलांतर झालंय, त्यामुळे या तिन्ही तालुक्यात मजुरांची टंचाई निर्माण झालीय. त्यातच कापसाला मिळणाऱ्या अल्प भावामुळे शेतकरी (Farmer) भाव वाढीची प्रतीक्षा करतोय. त्यामुळे कापूस वेचणी रखडल्याने पांढरे सोने काळवंडून जात असून त्यातून शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसणार आहे.

नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने उन्हाळी पिकांना तुषार सिंचनाद्वारे वाढवावे लागतंय, एप्रिल महिना सुरू होताच सूर्याचा प्रकोप वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळी ज्वारीसह भुईमुंगाचे पीक वाढवण्यासाठी तुषार सिंचन करावे लागतंय. त्यामुळे उन्हातान्हात शेतकरी पिकांना पाणी देण्यात व्यस्त झाला आहे.

यंदाच्या वर्षी धुळे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा मार्च महिन्यात अपेक्षेप्रमाणे जाणवला नाही. परंतु आता काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याबरोबरच झाडांच्या देखभालीला सुद्धा सुरुवात झाली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या हिरव्यागार झाडांची देखभाल आता राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने करण्यात येत असून, या झाडांची हिरवीगार पालवी तसेच दुरवरून दिसणारा हिरवे पणा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांचे मन प्रफुल्लित करणार आहे. यंदा उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान खात्याचे वतीने सांगण्यात येत आहे. तसेच मान्सून देखील उशिराने दाखल होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर भर उन्हाळ्यात हिरवीगार दिसणारी झाडे नक्कीच प्रवासी वर्गाला नवी आशा देतील असेच चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गव्हाची काढणी अंतिम टप्प्यावर आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गव्हाची पेरणी केली जात असते, मात्र जिल्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मोठ्या प्रमाणावर गव्हाचं नुकसान झालं आहे. मात्र चांगल्या गव्हाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत आहे. नंदुरबार बाजार समितीत चांगले गव्हाला दोन हजार पाचशे पासून ते सहा हजार पर्यंतच्या भाव मिळत आहे. परंतु अवकाळी पावसाच्या गव्हाला पाणी लागल्याने गहू खराब झाल्याने पाणी लागलेला गव्हाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गव्हाला पाणी लागल्याने गव्हाची कॉलेटी खराब झाल्याने, पाणी लागलेल्या गावाला अपेक्षित भाव मिळत नाही आहे. जिल्ह्यात यावर्षी १५ हजार ६५३ हेक्टर क्षेत्रात गहू लागवड करण्यात आलेली आहे. मात्र पावसामुळे हे क्षेत्र काही प्रमाणावर कमी झालं आहे.