Video : लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. जेव्हा ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेतात, व्हिडीओ व्हायरल 

| Updated on: Jul 05, 2021 | 7:23 PM

रविवारी मुरुड भागातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी . यांनी ट्रॅक्टर चालवत स्वतः पेरणी करून बीबीएफ पद्धतीचा अनुभव घेतला. हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

Video : लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. जेव्हा ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेतात, व्हिडीओ व्हायरल 
पृथ्वीराज बी पी यांनी ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली
Follow us on

लातूर: जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी . यांनी ट्रॅक्टरद्वारे बीबीएफ पद्धतीने पेरणी करून शेतकऱ्यांना बीबीएफ पद्धतीनेच पेरणी करण्याचं आवाहन केलं आहे. बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास शेती पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पन्न वाढीस मदत होते, असं पृथ्वीराज बी.पी म्हणाले आहेत. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पिकांची निगा राखायलाही मदत होते. त्यासाठी बीबीएफ पद्धत अवलंबावी असं कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, असं पृथ्वीराज बी.पी. म्हणाले. रविवारी मुरुड भागातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी . यांनी ट्रॅक्टर चालवत स्वतः पेरणी करून बीबीएफ पद्धतीचा अनुभव घेतला. (Latur Collector Prithviraj B P done cultivation at farm with driving tractor)

बीबीएफ तंत्रज्ञान नेमकं काय?

सोयाबीन रुंद वरंबा सरी पद्धतीनं बीबीएफ पद्धतीनं घेण्यात यावं. चार ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडून बळीराम नांगर हाणायचा. पाऊस कमी पडला तरी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणी करण्यात आलेलं पीक तग धरुन राहतं,

बीज प्रक्रिया करण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून फवारणी अधिक वेळ करावी लागणार नाही. बीज प्रक्रिया केल्यास बियाणं उगवण होईपर्यंत चांगलं राहिल, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

लातूर जिल्ह्यात आज सर्वदूर पाऊस कोसळतो आहे . लातूर,रेणापूर ,उदगीर ,औसा , निलंगा आणि अहमदपूर तालुक्याच्या अनेक भागात पाऊस कोसळला आहे . गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. आज सायंकाळी 4 वाजल्या पासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी अर्धा तास तर काही ठिकाणी एक तासा पेक्षा जास्त पाऊस पडला आहे . आभाळ आल्याने दिवसभर वातवरणात उखाडा होता ,पावसाला सुरुवात झाल्याने वातवरणात आता गारठा पसरला आहे .

लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बीबीएफ या नवीन पद्धतीनेच पेरणी करावी असे, आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीदेखील केलं आहे. लातूर जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करतात, त्यांना बीबीएफ ही नवीन पेरणीची पद्धत उपयोगी पडेल, असं कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे .

इतर बातम्या

नाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

(Latur Collector Prithviraj B P done cultivation at farm with driving tractor)