शाहिद पठाण, गोंदिया : कृषी विभागाने गोंदिया (Gondia Of Agriculture Department) जिल्ह्यात धडक मोहीम राबवून कृषी केंद्रांची (Agriculture center) तपासणी केली. त्यावेळी त्यांना अनियमितता आढळल्यामुळे सहा कृषी केंद्रांचे परवाने गोंदिया (Gondia) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. अचानक कारवाई करण्यात आल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
गर्रा बु, येडे कृषी केंद्र, कुरेशी कृषी केंद्र ककोडी, त्याचबरोबर देवरी या दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाराऱ्यांनी दिली आहे. तर नाकाडे कृषी केंद्र केशोरी, ता. अर्जुनी/मोरगाव यांचा परवाना विनंती अर्जानुसार रद्द करण्यात आला. मे. जांभूळकर कृषी केंद्र ककोडी, ता. देवरी या कृषी केंद्राचा परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला. मे. नाकाडे कृषी केंद्र केशोरी, ता. अर्जुनी मोरगाव यांचा परवाना विनंती अर्जानुसार रद्द करण्यात आला. कृषकोन्नती शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि. ककोडी, ता. देवरी, किसानमित्र कृषी केंद्र ककोडी, ता. देवरी या दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले. मे. नाकाडे कृषी केंद्र केशोरी, ता. अर्जुनी मोरगाव या कृषी केंद्र धारकांच्या विनंती अर्जा रद्द करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणी मोहिमेदरम्यान काही कृषी केंद्रांमध्ये ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसताना निविष्ठा विक्री करणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे, बिलावर शेतकऱ्याची स्वाक्षरी न घेणे तसेच बॅच नंबर उत्पादनाची तारीख न लिहिणे, मुदतबाह्य साठा बाळगणे आदी उणिवा आढळल्या. त्यामुळे अशा कृषी केंद्रांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.