नागपूर : शेतातील उत्पादन आणि पिके बहरण्यासाठी (Rain) पाऊस हा गरजेचा असतो. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की काय होते त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सबंध राज्यात पावसाचा हाहाकार आहे. त्यामुळे उत्पादनवाढीचे सोडा शिवरात आहे ते पदरात पडेल की नाही अशी स्थिती आहे. अतिवृष्टीमुळे (Vegetable Damage) भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे वाहतुकीचाही प्रश्न निर्माण झाल्याने (Vegetable Rate) भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. वाढत्या पावसामुळे खरिपातील पिके तर धोक्यात आहेतच पण भाजीपाल्याच्या उत्पादनात देखील मोठी घट होत आहे. त्यामुळे दर वाढले तरी त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. सध्या सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. तर पावसामुळे नवीन लागवडही ठप्प असल्याने भविष्यात भाजीपाल्याचे दर गगणाला भिडणार यामध्ये शंका नाही.
शेतशिवरातील घटलेल्या भाजीपाल्याच्या उत्पादनाचा परिणाम थेट आता शहरातील बाजारपेठेवर होत आहे. आवक वाढली की दरात घसरण आणि आवक घटली दरात वाढ हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. सध्या नागपूर शहरात मागणीच्या भाजीपाल्याचा पुरवठा हा कमी होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतातून भाजीपाला बाहेर निघालेला नाही. पुर आणि अतिवृष्टीमुळे भाजीपालाल्याचं नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात पण यंदा दरवाढीची तीव्रता ही अधिक आहे.
पावसामुळे पालेभाज्यांचे अधिकचे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबरचा सहभाग आहे. दुसरीकडे बटाटा, मिरची. कारले, वांगी यांचे नुकसान झाले नसले तरी मागणीच्या तुनलेत पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या पालेभाजांचा पंचनामा करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची जोपासणा केली मात्र, ऐनवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. त्यामुळे नुकसाभरपाईची मागणी होत आहे.
भाजी आठवडापूर्वीचे दर आताचे दर
फरसबी 170 रु. किलो 320 रु. किलो
शिमला 80 रु. किलो 120 रु. किलो
ढेमुस 100 रु. किलो 140 रु. किलो
कारली 80 रु. किलो 120 रु. किलो
फुलकोबी 80 रु. किलो 120 रु. किलो
कोथिंबीर 120 रु. किलो 160 रु. किलो
पालक 80 रु. किलो 120 रु. किलो
मेथी 120 रु. किलो 160 रु. किलो