मोठी बातमी, इफकोचा नॅनो यूरीया राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन

| Updated on: Jul 09, 2021 | 2:56 PM

'इफको' या रासायनिक खत उद्योगातील संस्थेने विकसित केलेल्या द्रवरुप 'नॅनो यूरियाच्या' महाराष्ट्रातील खत वितरणाचा शुभारंभ आज कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

मोठी बातमी, इफकोचा नॅनो यूरीया राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन
दादा भुसे, कृषीमंत्री
Follow us on

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मालेगाव, नाशिक: ‘इफको’ या रासायनिक खत उद्योगातील संस्थेने विकसित केलेल्या द्रवरुप ‘नॅनो यूरियाच्या’ महाराष्ट्रातील खत वितरणाचा शुभारंभ आज कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. आजपासून या ‘ नॅनो युरिया ‘ खताचे वितरण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. दादा भुसे यांनी नॅनो यूरीया शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. (Maharashtra Agriculture Minister Dada Bhuse virtually Flagged off IFFCO Nano Urea truck for farmers of state )

नॅनो यूरीयामुळं प्रदूषण रोखण्यास मदत

नॅनो यूरीयाच्या महाराष्ट्राकडे येणाऱ्या ट्रकला कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हा सर्व कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला.
यावेळी झालेल्या ऑनलाइन उदघाटन कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन करतांना कंपनीच्या या उत्पादनाचे मोठे कौतुक केले.

इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसे यांचं आमंत्रण

इफकोच्या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या कंपनीनं महाराष्ट्रात येण्यासाठीचे आमंत्रण कृषीमंत्र्यांनी दिले. नव्या स्वरूपातील हे ‘ द्रवरूप खत ‘ पारंपारिक यूरियापेक्षा स्वस्त आणि हाताळण्यास सुलभ असून त्यामुळे प्रदुषण रोखण्यासही मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

31 मे रोजी नॅनो यूरीया लाँच

इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आले. सामान्य यूरियाची मागणी 50 टक्केहून कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचे लाँचिगं करण्यात आलं आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरुपात उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून मिळतील

शेतकऱ्यांना किफायतशीर पर्याय उपलब्ध

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.

इतर बातम्या:

IFFCO च्या नॅनो लिक्विड यूरियाचं व्यावसायिक उत्पादन सुरु, गुजरातमधून पहिली खेप ‘या’ राज्याकडे रवाना

इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार

Maharashtra Agriculture Minister Dada Bhuse virtually Flagged off IFFCO Nano Urea truck for farmers of state