धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस अवघ्या काही दिवसांमध्ये पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी आता बी-बियाणे (bogus seeds) खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र बी-बियाणे खरेदी करत असताना एकाच वाणाच्या मागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये, एकच प्रकारचे वाण सर्व शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध वाहनांचा प्रयोगाला प्राधान्य द्यावे असं कृषी तज्ज्ञ आणि कृषी केंद्र चालकांनी आवाहन केले आहे. याबाबत कृषी विभागाने (agricultural news) शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची मागणीही करण्यात येत आहे. मात्र शेतकरी या आवहानाला कसा प्रतिसाद देतात, हे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. ठराविक वानाची मागणी वाढल्यास त्यामध्ये काळाबाजार होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा आवाहनही करण्यात आले आहे असं दिलीप उपाध्ये, कृषी केंद्र चालक यांनी सांगितलं.
पावसाचा मृग नक्षत्र कोरडाच गेल्याने नाशिकच्या मालेगावसह जिल्हाभरात शेतकरी हवालदील झाला आहे. पाऊस वेळेवर पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागतीचे कामे पूर्ण केली. तसेच खते बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाला आता आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पाऊस लांबल्याने जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजावरून यंदा मान्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते, त्यांनी मोठ्या उत्साहाने मान्सूनपूर्व कपाशी लागवड केली. मात्र यावर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरला. मृग नक्षत्र लागून व जून महिना संपत येत असला तरीही तापमानात वाढ तेवढीच आहे. उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या जीवाची लाही-लाही होताना दिसत आहे. दुपारच्या वेळेस अचानक आभाळ दाटून येत असले तरीही पाऊस काही पडत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्यांनी आपल्या परीने कपाशी लागवड करून आपल्या सोयीने सिंचन पाणी देणे सुरू केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसून फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांची मात्र कपाशी लागवड अजूनही झाली नाही. आता मान्सून केव्हा दाखल होणार अशा चिंतेने शेतकरी वर्ग हतबल झालेला दिसत आहे.
गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यातील 18 दिवस लोटून गेले असूनही पावसाने एंट्री मारली नाही. ढग दाटून येतात, तेवढाच दिलासा असून यामुळे तापमानात घट झाली. उकाडा मात्र असह्य होत आहे. रविवारी जिल्ह्याचा पारा 40.8 अंशावर होता. मात्र उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही व घामाचे लोट वाहत होते. या परिस्थितीवर आता फक्त पाऊसच तोडगा असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत.