पावसाने ओढ दिल्याने कपाशीच्या पिकांवर किडरोगाचा प्रादुर्भाव, फवारणीचा खर्च वाढला, बळीराजा मेटाकुटीला!
पावसाने ओढ दिल्याने नांदेडमध्ये कपाशीच्या पिकांवर किडरोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च वाढला असून पिकांला वाचवण्यासाठी शेतकरी फवारणीची धडपड करण्यात व्यस्त आहे.
-
-
पावसाने ओढ दिल्याने नांदेडमध्ये कपाशीच्या पिकांवर किडरोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च वाढला असून पिकांला वाचवण्यासाठी शेतकरी फवारणीची धडपड करण्यात व्यस्त आहे.
-
-
गेल्या बारा दिवसापासून वरुणराजा रुसलाय, त्यामुळे कापसाची वाढ खुंटत चाललीय. मुखेड तालुक्यातील डोंगराळ भागातील बहुतांश शेतकऱ्यांची मदार ही कापसाच्या पिकांवर अवलंबून आहे.
-
-
मात्र पावसाने दगा दिल्याने विविध किडरोगाचा प्रादुर्भाव पिकांवर झालाय. त्यामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च वाढलाय.
-
-
फुलोरा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या कपाशीला वाचवण्यासाठी इकडून तिकडून जुळवाजुळव करत शेतकरी फवारणी करतोय. मात्र येत्या आठवडाभरात पाऊस आला नाही तर पीक हाथची जाण्याची भीती व्यक्त केल्या जातेय.