कोरोना संकटात ना शेतकरी थांबला ना कारखाने, यंदाच्या गाळप हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप

| Updated on: May 19, 2021 | 10:38 AM

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यंदा एकूण 10.62 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. (Maharashtra Sugar Mills)

कोरोना संकटात ना शेतकरी थांबला ना कारखाने, यंदाच्या गाळप हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप
साखर कारखाना
Follow us on

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप केलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार 12 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आलं आहे. यंदा एकूण 10.62 लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या राज्यातील चार कारखान्यांचं गाळप सुरु असून त्यानंतर 2020-21 च्या हंगामाची सांगता होईल. (Maharashtra Sugar Mills making record in production of Sugar during corona)

190 साखर कारखान्यांनी घेतलं साखरेचं उत्पादन

महाराष्ट्रात एकूण 190 साखर कारखाने सुरु होते. राज्यात यंदाच्या 2020-21 च्या हंगामात 95 सहकारी आणि 95 खासगी अशा एकूण 190 कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतले. गतवर्षीच्या हंगामात 550 मेट्रिक लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. यावर्षीच्या हंगामात एक हजार 12 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्यात आलं. राज्यात अद्याप चार साखर कारखाने सुरू असून येत्या तीन-चार दिवसांत यंदाचा हंगाम संपेल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात

यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले असून साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण 12 टक्के इतके आहे. तर, पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून सरासरी साखर उतारा 10.97 टक्के इतका आहे. तर सर्वात कमी उतारा नागपूर विभागात राहिला आहे.

कोरोनाच्या संकटातही विक्रमी गाळप

2020-21 चा गाळप हंगाम हा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु झाला. राज्यातील शेतकऱ्यांची मेहनत, साखर कारखान्यांची यंत्रणा याद्वारे राज्यामध्ये कोरोनाचं संकट असतानाही विक्रमी गाळप झालं आहे. यानिमित्तानं महाराष्ट्र हे साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

विभागनिहाय ऊस गाळप (मेट्रिक टन), साखरेचे उत्पादन (लाख क्विंटलमध्ये) आणि उतारा टक्केवारी

विभागमेट्रिक टन गाळपसाखरेचं उत्पादन (लाख क्विंटलमध्ये)उतारा
कोल्हापूर231.09277.3812
पुणे230.93253.2610.97
सोलापूर 175.86164.899.38
अहमदनगर 169.64166.589.82
औरंगाबाद 100.0396.909.69
नांदेड 94.28949.97
अमरावती 5.825.208.93
नागपूर
4.353.908.97

संबंधित बातम्या:

दिमाखात डोलणारी 25 लाखांची केळीची बाग डोळ्यांदेखत भुईसपाट, तोक्ते चक्रीवादळानं शेतकऱ्यांची स्वप्न चक्काचूर

ब्राह्मीची लागवड करा आणि मिळवा अधिक नफा, कमी खर्च आणि मेहनतीमध्ये जास्त फायदा

(Maharashtra Sugar Mills making record in production of Sugar during corona)