मुंबई: ऊस आणि साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर समजलं जातं. राज्यात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 2020-21 च्या गळीत हंगामात 1004.71 लाख टन उसाचं गाळप केलं आहे. यामध्ये 90 खासगी आणि 95 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यापूर्वी 2017-18 मध्ये राज्यात सर्वाधिक 954 लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 1053.44 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे. 18 साखर कारखान्यांकडून गाळप सुरु असल्याची माहिती आहे. (Maharashtra sugar mills produce 1053 lakh quintal sugar during this season)
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर आणि पुणे जिल्हे आघाडीवर आहेत. कोल्हापूर आणि पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक ऊसाचं क्षेत्र आहे. येथील कारखान्यांकडून राज्यातील साखरेच्या उत्पादनापैकी जवळपास 50 टक्के उत्पादन होतं.
महाराष्ट्रातील औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि अमरावतीमध्येही साखर कारखाने आहेत. या परिसरातील कारखान्यांनी 197 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन कलें आहे. राज्याच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत 19 टक्के साखर या भागातून उत्पादित केली गेलीय. या परिसरात एकूण 53 साखर कारखाने चालू आहेत. अहमदनगरमध्ये 10 आणि औरंगाबादमध्ये 11 साखर कारखाने सुरु आहेत.
साखर कारखान्यांसमोर साखरेच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं विकावी लागतेय. नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडच्यानुसार किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं साखर विक्री केली जातेय. सध्याचा एक क्विंटल साखर 3100 रुपयांना विकली जातेय. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साखरेचा अतिरिक्त साठा विक्री करण्यासाठी 60 लाख टन साखरेची निर्यात करणार असल्याची माहिती दिली होती. राज्य आणि केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना इथेनॉल, गुळ आणि इत्यादी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी आवाहन केलं आहे.
IPL 2021 : ‘नाराज मत होना, हार के बाद जीत हैं!’ असं तर विराट कोहली रिषभला सांगत नसेल ना?, पाहा व्हिडीओhttps://t.co/lk7k2EuBWm#IPL #IPL2021 #DCvsRCB #RCBvsDC #ViratKohli #RishabhPant
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत दमदार भाषण, वाचा 10 महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे
(Maharashtra sugar mills produce 1053 lakh quintal sugar during this season)