Video: मराठवाड्यात अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर

| Updated on: May 09, 2021 | 6:53 PM

बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं लेंढी नदी दुथडी भरून वाहत होती. Maharashtra rain Dharur Beed

Video: मराठवाड्यात अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर
Beed Dharur Rain
Follow us on

बीड: राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याप्रमाणं मराठावाड्यात मुसळधार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं लेंढी नदी दुथडी भरून वाहत होती. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलीय. आगामी पाच दिवसांमध्ये  मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे. पाऊस आणि गारपिटीने अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं आहे. (Maharashtra Weather Update Heavy Pre Monsoon rain shower at Dharur taluka of Beed)

बीडमध्ये लेंढी नदीला पूर

जिल्ह्यातील धारुर तालुक्यात विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट वादळी वा – यासह पावसाने हजेरी लावली. भर उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात पहाडी पारगाव, भोगलवाडी,थेटेगव्हाण येथील लेंढी नदी दुथडी भरून वाहत आहे. बीड गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर, आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाशिममध्येही पावसाची हजेरी

मालेगाव शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात चौथ्या दिवशी पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातील उन्हाळी पिकांच नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यात ही पाऊस

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला.

पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेंनं पुढील 24 तासांमध्ये कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाचं (Rain) कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झालीये, तर उत्तर कर्नाटकचा काही अंतर्गत भाग ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.   आगामी पाच दिवस हे मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे. पाऊस आणि गारपिटीने अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं आहे.

गोंदिया जिल्ह्यात धानाचं नुकसान

गोंदिया जिल्हातील विविध तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमगाव तालुक्यात अनेक शेतकर्‍यांच्या रब्बी पिकाचे धान कापणीसाठी आले होते. पूर्व मोसमी पाऊस आणि गारपिटीने जमिनीवर झडल्या मूळे धान पिकाचे नुकसानं झालं आहे. याची माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देत तलाठी नारायण तोरणकर व कृषी सहाय्यक प्रियांका बावनकर यांना पंचनामा करण्याकरिता आदेश दिले. त्यानुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी नुकसान झालेल्या धान पिकाची पाहणी केली. त्यामध्ये एकूण जवळपास 35 शेतकऱ्यांच्या धानाच्या नुकसानाचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांचेसरासरी 40 टक्के नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. पंचनामा व मागणी अर्ज हे तहसील कार्यालयात सादर करणार, अशी माहिती तलाठी यांनी दिली.

संबंधित बातम्या:

Weather report: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज

Weather report: राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; उकाडा आणखी वाढणार

(Maharashtra Weather Update Heavy Pre Monsoon rain shower at Dharur taluka of Beed)