मावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाला ची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तालुक्यातील शेतकर्याने गावरान टोमॅटोच्या उत्पादनातून मोठी कमाई केली आहे. खर्च कमी आल्याने त्याला फायदा झाला आहे. कसा वाचवला या शेतकर्याने अतिरिक्त खर्च? टोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी त्याने काय केलं हे याची शेतकर्यांना उत्सुकता आहे.
मावळमध्ये रब्बी पिकांना मागणी
मावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. शेतातील भात काढून झाल्यावर अनेक शेतकरी आता भाजी लागवड करू लागले आहेत. त्यातच या शेतकऱ्यांने एक आदर्श घालून दिला आहे. त्याने अवघ्या पाऊण एकरात गावरान टोमॅटोचे चांगले उत्पादन घेतले. पाऊण एकर मध्ये टोमॅटो ची लागवड करून शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले.
श्रेयाने केले लखपती
पारंपारिक शेतीतून फारसे चांगले उत्पादन मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते. तर काही शेतकरी पारंपारिक शेती व्यतिरिक्त काही हटके प्रयोग सुद्धा करतात. मावळ मधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ पाऊण एकर क्षेत्रात श्रेया जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली. यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे. केवळ 50 ते 60 हजार रुपये खर्च त्यांना या टोमॅटोची लागवड करताना आला.
घरच्या घरी टोमॅटो ची पिके तयार करून त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात ही पिके लावली आहे.
सेंद्रिय खतावर दिला जोर
राज्यात अनेक शेतकरी टोमॅटो उत्पादक आहे. पण काही भागात अधिक उत्पादन झाल्याने भाव घसरतो. तर खते आणि फवारणीचा खर्चही अधिक होतो. त्यामुळे उत्पादनाचा खर्च आणि विक्रीचा ताळमेळ बसत नाही. सुनील किरवे यांनी त्यासाठी अजून एक युक्ती वापरली. संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर करून टोमॅटोची शेती किरवे यांनी फुलवली आहे. बाजारात या गावरान टोमॅटोना साध्या टोमॅटो पेक्षा 5 ते 10 टक्के भाव जास्त मिळत आहे. शिवाय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या टोमॅटोची मागणी आहे.