नांदेड : वातावरणातील बदलाचा परिणाम शेती व्यवसयाशी संबंधित सर्वच बाबींवर झाला आहे. शेती पिकांच्या उत्पादनात घट झाली तर आता वाढत्या उन्हामुळे (Milk Production) दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे. चालू एप्रिल महिन्यातच गायी-म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या दराचा थेट लाभ शेतकऱ्यांना झालेलाच नाही. कारण सध्याच्या (Increase Temperature) उन्हामुळे दुधाचे प्रमाण तर कमी झालेच आहे शिवाय जनावरांची पालनपोषण करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे. नांदेड जिल्ह्यातही पारा वाढल्याने जनावरांना पत्र्याच्या गोठ्यामध्ये उष्मघाताचा त्रास होऊ लागल्याने थेट टेंट उभे करावे लागत आहे. दुसरीकडे हिरवा (Green Fodder) चारा तर मिळणे अशक्यच पण कडब्याचे दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे शेतीला ज्या दूध व्यवसायाची जोड असते त्यालाच आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आतापर्यंत उपलब्ध पाण्याच्या आधारावर जनावरांना मका, गवत यासारखा हिरवा चारा होता. पण पाणीपातळीत घट झाली असून आता हिरवा चारा दुरापस्त झाला आहे. शिवाय यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असून त्याचा परिणाम कडबा दरावर झाला आहे. ज्वारीची काढणी होताच कडब्याचे दर हे नियंत्रणात असतात पण यंदा हंगामाच्या सुरवातीलाच कडबा 1 हजार रुपये शेकडा असा विकला जात आहे. म्हणजेच 10 रुपयांना कडब्याची एक पेंडी मिळत आहे. या सर्व बाबींचा परिणाम दूध उत्पादनावर झालेला आहे. गायी आणि म्हशीच्या दरवाढीचा थेट लाभ अद्यापही शेतकऱ्यांना थेट झालेला नाही.
सध्या मराठवाड्यातही उन्हाच्या झळा अधिकत तीव्र होत आहेत. सर्रास सर्वच शेतकरी हे जनावरांसाठी गोठा म्हणून पत्र्याचे शेड उभारतात. मात्र, वाढत्या उन्हामुळे जनावरांना उष्मघाताचा त्रास होत असल्याने आता टेंट उभारले जात आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये टेंट टाकूनच जनावरांची सोय करण्यात आली आहे. यातच भारनियमन वाढत असल्याने जनावरांना वेळेत पाणी देखील मिळत नाही. यासर्व बाबींचा परिणाम हा दूध उत्पादनावर झालेला आहे.
उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावल्याने जनावरे आजारी पडणार नाहीत.
Orchard : प्रतिकूल परस्थितीमध्येही आंबा लागवडीलाच प्राधान्य, योजनेचा लाभ घेऊन पीक पध्दतीमध्ये बदल
Goat rearing : जातिवंत शेळ्यांसाठी कृत्रिम रेतन, देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात