बीड : शेती हा केवळ सल्ला देण्याचा आणि बांधावरुन करण्याचा व्यवसाय राहिला नसून प्रत्यक्ष जमिनीशी एकरुप होऊनच (Production) उत्पादन वाढीचे स्वप्न सत्यात उरणारा व्यवसाय झाला आहे. त्याच बरोबर काळानुरुप (crop method) पीक पध्दतीमधील बदलही महत्वाचा ठरत आहे. उत्पादनवाढीचे केवळ नियोजनच न करता प्रत्यक्षात काय करावे लागेल याचा अभ्यास करुन केज तालुक्यातील केकाणवाडी येथील बाबासाहेब केकान यांनी (Carrot Farming) गाजराची लागवड केली होती. लागवड करताना केवळ मकर संक्रातीच्या सणामध्ये विक्री करता यावी असे नियोजन त्यांचे होते. गतवर्षी अवघ्या 5 गुंठ्यातील गाजरांनी 25 हजाराचा निव्वळ नफा मिळवून दिला होता. या दरम्यानच त्यांना या अनोख्या प्रयोगातील गोडवा कळाला आणि त्यांनी गाजराचे उत्पादन घेण्याचा निर्धार केला होता. त्यानुसारच त्यांनी संक्राती दरम्यानच्या तीन दिवसात 20 क्विंटल गाजराची विक्री करून 50 हजार रुपये कमावले आहेत. गोड गाजराच्या एकरी उत्पादनातून 2 लाख रुपायांची कमाई केली आहे.
गाजराचे पीक तीन महिन्याचे असून लागवडीपूर्वी नांगरणी, मोगडा, एक बैल पाळी अशी पेरणीपूर्व मशागत केली. त्यानंतर ऑक्टोंबर अखेर एकरी दहा किलो ग्रॅम याप्रमाणे गाजराचे बियाणे फेक पद्धतीने लागवड करण्यात आले. चांगल्या पद्धतीने उगवण व्हावी यासाठी सुरुवातीला पाण्याची एक पाळी आणि त्यानंतर महिनाभरानंतर दुसरी पाळी देण्यात आली. एक पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक पोते डीएपी खताची मात्रा देण्यात आली होती. गाजराची संपूर्ण वाढ होण्याचा एकूण कालावधी 90 दिवसाचा आहे.
पिकलेल्या मालासाठी सर्वात महत्वाचे असते ते मार्केट. मात्र, याचा प्रश्न केकान यांनी स्वत:च मिटवला होता. कारण शेतातील गोड गाजरं थेट आंबोजोगाई शहरातील बाजारपेठेत ते स्वत:च विकायचे. दरही चांगला मिळतो. वाहतुकीचा खर्च नाही. ऐन संक्रातीच्या कालावधीमध्ये गाजराला मागणी असते. या दरम्यानच्या काळात त्यांनी 2 क्विंटल गाजरं विक्रीतून त्यांनी 50 हजार रुपये कमावले होते. तर खर्च वजा जाता एकरी दीड लाख रुपयांचे मिळते. जास्तीचे पाणी लागत नाही वातावरण बदलाचा गाजर शेतीवर कुठलाही वाईट परिणाम होत नसल्याचेही त्यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.
मजूर हा शेती व्यवसयाचा महत्वाचा भाग असला तरी काळाच्या ओघात लोप पावत आहे. त्यामुळे बाबासाहेब केकान यांनी लागवडीपासून ते काढणीपर्यंत घरातील सदस्यांचीच मदत घेतली. मशागत, पाण्याचे व्यवस्थापन, तोडणी आणि बाजारपेठेत विक्री या प्रक्रियेत त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळाल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मजुरी, बियाणे आणि खत असा एकूण पन्नास हजार रूपये एकरी खर्च येतो. या वर्षी एक एकर गाजराची शेती केली होती. पुढच्या वर्षी मात्र दोन एकर गाजर शेती करण्याचा मानस केकान कुटुंबियांचा आहे.
किसान रेलमुळे चिक्कूला मिळाली बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् खर्चात बचत
नियम साखर कारखान्यांसाठी नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच, ‘त्या’ निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक
वीज कापायला आल्यास ‘झटके’ देऊ, रघुनाथ पाटलांचा इशारा, न्यायालयाचे आदेश काय?