जळगाव: राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागात ऊसाच्या फडांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. मुक्ताईनगर निमखेडीत शेतकऱ्याच्या शेतातील तीन एकर ऊसाला आग लागली. त्यामध्ये त्यांचं तब्बल 6 लाखांचं नुकसान झालं आहे. (Muktainagar Jalgaon Nimkhedi three acre Sugarcane damaged in fire)
ऊस जळाल्यानं सोपान पाटील संकटात
मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील शेतकऱ्याच्या शेतात ही घटना घडली. सोपान पाटील यांच्या शेतातील शॉर्ट सर्किटमुळे तीन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. सोपान पाटील यांच्या शेतात ही घटना घडल्यान ते संकटात सापडले आहेत. त्यांचं घटनेत सहा लाखाचे नुकसान झाले आहे. त्यांनी मदत मिळण्याची मागणी केलीय.
जिल्ह्यातील कामेरी परिसरातील कामेरी- तुजारपूर रोडवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उस पिकवलेला आहे. मात्र येथे उसाच्या फडावरुन गेलेल्या विजेच्या तारेत अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने येथे आग लागली. ही आग नंतर मोठी होऊन परिसरातील 40 एकरामध्ये ही आग पसरली. पुढे आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याने तब्बल 40 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी हा रात्रंदिवस शेतात राबतो. मेहनत करुन तो काळ्या मतीत पीक घेतो. अनेकवेळी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा अनेकविध संकटांना त्याला तोंड द्यावे लागते. कित्येक वेळा तर अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे हातात आलेल्या पिकाला त्याला मुकावे लागते. मात्र, महावितरण म्हणजेच सरकारमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. माजलगाव तालुक्यात विजेची नीट जोडणी केलेली नसल्यामुळे येथील परिसरात सर्रास शॉर्टसर्किट होतात. त्यामुळे शेतात हमखास आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. शॉर्टसर्किटमुळे तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना माजलगावमध्ये घडली आहे.
video | शेतात शॉर्टसर्किट, काही क्षणांत तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक, पाहा व्हिडीओhttps://t.co/0nnWhqj8lg#sugarcane | #fire | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO | शॉर्टसर्किटचं निमित्त, तब्बल 40 एकरातील ऊस आगीच्या कचाट्यात, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
video | शेतात शॉर्टसर्किट, काही क्षणांत तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक, पाहा व्हिडीओ
(Muktainagar Jalgaon Nimkhedi three acre Sugarcane damaged in fire)