मुंबई : एपीएमसी फळ मार्केटमध्ये 2019 पासून हापूस आंब्याचे तीन शेतकऱ्यांचे 11 लाख 90 हजार रुपये थकले होते. ही फसवणूक व्यापाऱ्याकडून करण्यात आली होती. ते पैसे आता आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाने त्यसाठी प्रयत्न सुरु केले होते. सभापती अशोक डक आणि संचालक मंडळाने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर कष्टाचे पैसे मिळाल्यानतंर सध्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (mumbai apmc fruit market given the rupees of three of mango producing farmers)
तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी, लांजा येथील रमेश देसाई, अबिद काझी आणि बिलाल इसफ या शेतकऱ्यांनी जवळपास 2400 अंब्याच्या पेट्या फळ मार्केटमध्ये असलेल्या आंबा व्यापारी दत्तात्रय हरिभाऊ कंपनी एफ 180 यांना पाठवल्या होत्या. व्यापाऱ्याने आंब्याची विक्री करून त्याची त्याची पावतीसुद्धा या शेतकऱ्यांना पाठवली होती. मात्र गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नव्हते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाला फसवणूक झाल्याचा अर्ज केला होता. परंतू या प्रकराची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नव्हती. शिवाय व्यापाऱ्यावर कारवाई देखील न केल्याने पैसे मिळत नव्हते. तसेच, व्यापाऱ्याने दिलेले धनादेश वटले जात नव्हते. या सर्व प्रकारमुळे हे तिन्ही शेतकरी भलतेच हैराण झाले होते.
त्यानंतर सभापती अशोक डक आणि संचालक मंडळाने या प्रकरणात लक्ष घातले. शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. शेवटी त्यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले. तिन्ही शेतकऱ्यांना जवळपास 11 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश एपीएमसी प्रशासनाकडून सुपूर्द करण्यात आला. तब्बल तीन वर्षांनंतर कष्टाचे पैसे मिळाल्यानतंर सध्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकऱ्यांना पैसे मिळाले असले तरी न्या भेटण्यासाठी तब्बल तीन वर्ष लागल्याने या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आंबा विक्रीतदेखील फसवणूक झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. तीन वर्षांपूर्वीचे पैसे मिळ्वण्यासाठी खूप ससेहोलपट झाली असून हजारो रुपये प्रवास खर्च झाल्याचे शेतकरी अबिद काझी यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्वीदेखील कांदा व्यापाऱ्याकडून कांदा शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यात प्रशासनाने एकूण 26 लाख रुपये शेतकऱ्यांना अदा केले होते. त्यामुळे या दोन्ही प्रकरणातून बघितलं तर वर्षानुवर्षे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निष्कर्ष मांडले जात आहेत.
इतर बातम्या :
आठ दिवसांत सरकारचे घूमजाव; थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणारच, नितीन राऊतांची माहिती
कोणालाही धनादेश देण्यापूर्वी काळजी घ्या; सर्वोच्च न्यायालयानं दिला मोठा निर्णय