नवी मुंबई: आशियातील सर्वात मोठी बाजार समिती मुंबई बाजार समितीमध्ये कांद्यांच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये सोमवारी 256 गाड्यांची आवक झाली. तीस हजार गोणी कांदा घाऊक बाजारात आला आहे त्यामुळे कांद्याचे दर गडगडले. (Mumbai APMC Onion, Potato and Garlic rates down and alphonso supply increased)
राज्यासह गुजरातमधील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. आज मार्केटमध्ये नाशिक आणि पुण्यातील कांदा 5 ते 15 रुपये प्रति किलो तर गुजरात कांदा 5 ते 10 रुपये प्रति किलो विकला जात आहे. बाजारात गुजरात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कांद्यासह बटाटा आणि लसणाचे ही दर कमी झाले आहेत. तीस हजाराहून अधिक गोणी बटाट्याची आवक आज मार्केटमध्ये झाली असून 6 ते 10 रुपये प्रतिकिलो बटाटा विकला जात आहे. तर जवळपास सात हजार लसूण गोणीची आवाक बाजारात असून 25 ते 65 रुपये प्रतिकिलो दराने लसणाची विक्री होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची बंपर आवक झाली असून दरात घसरण झाली आहे. तर, लवकरच आंबा सामान्यांच्या आवाक्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फळ मार्केटमध्ये आज 500 गाड्यांची आवाक झाली असून जवळपास तीस हजार पेटी आंबा मार्केटमध्ये आला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची आज जवळपास तेवीस हजार पेटी बाजारात आली आहे. तर, सहा हजार क्रेट कर्नाटक आणि केरळ आंबा बाजारात आला आहे. मागील आठवड्यापेक्षा केरळ आणि कर्नाटक आंब्याची आवक घटली असून हापूस आंबा आवक मात्र सहा हजार पेटीने वाढली आहे.
मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेचhttps://t.co/VE6FIiIjFv#Mumbai | #APMC | #Alphonso | #Mangorates
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या:
(Mumbai APMC Onion, Potato and Garlic rates down and alphonso supply increased)