मुंबई – मटण म्हणलं की अनेकांना रविवार डोळ्यासमोर येतो. रविवारी (sunday) आपल्याकडे नॉनव्हेज (non vej) खाण्याचं प्रमाण अधिक आहे. परंतु काही मटण खाणारे असे आहेत की ते आठवड्यातले वार ठरवून मटण खातात. तसेच अनेकांना मटणातील काही भाग खायला खुप आवडतात. त्यासाठी मटण विक्रेत्यासोबत त्यांची चांगली दोस्ती असते. त्यात संपुर्ण महाराष्ट्रात (maharashra) उस्मानाबादी मटण म्हणलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं कारण त्या मटणाची चवचं तशी आहे. काहीजण खास पाहुणे घरी येणार असतील तर असा बेत आखतात आणि पाहुण्यांना खूष करतात. आपल्या आवडीचे चमचमीत पदार्थ घरी बनवून खाण्यात भारतात अनेकजण माहिर आहेत. अचानक तुम्हाला एखाद्याने विचारलं की तुझे आवडते पदार्थ सांग तर पटकन तुमच्या तोंडून मटण किंवा चिकनचं नाव निघतं, त्यापैकी तुम्ही आवडत्या डिश त्याला सांगून टाकता. परंतु मटण म्हणलं की तुमच्या तोंडात डायरेक्ट उस्मानाबादी मटण येतं.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही पाहायला मिळतात उस्मानाबादी शेळ्या
महाराष्ट्रात प्रसिध्द अशा उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची थोरवी आता तुमच्या लक्षात तर आलीचं असेल. समजा तुम्ही हे मटण खाल्लं नसेल तर एकदा खाऊन बघा किंवा ट्राय करायला काय हरकत आहे. हे मटण फक्त गावाकडचं फेमस आहे असं नाहीतर त्याला शहरात देखील तितकीच मागणी आहे. उस्मानाबादी शेळीची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण तिथं बोकडाचं मटण घेण्यासाठी आजही रांगा लागलेल्या असतात. महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी तुम्हाला उस्मानाबादी शेळ्या पाहायला मिळतात. तसेच आता लातूर उस्मानाबाद अहमदनगर, परभणी आणि सोलापूर या शहरात तुम्हाला या शेळ्या पाहायला मिळतं आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा भागातही तुम्हाला उस्मानाबादी शेळ्या आढळतील कारण मटणाची चवचं भारी आहे. बोकडाला इतकी प्रसिध्दी मिळाली आहे की, त्याचं नावं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी देण्यात आलं आहे.
उस्मानाबादी बोकडं दिसायलं एकदम देखणं असतं
उस्मानाबादी ही शेळीची जात जरी मटणासाठी अनेकांना आवडत असली तरी त्यांना त्या शेळीला दुध अधिक प्रमाणात असतं. मुळात ही जात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मांस खाण्यासाठी प्रामुख्याने वाढवली जाते. या शेळीच्या जातीचं बोकडं दिसायला एकदम देखणं असतं. अधिक बोकडं ही काळ्या रंगाची असतात. त्यामुळे ती प्रचंड आकर्षित दिसतात. अतिशय देखणं असं बोकडाचं मटण खाण्यासाठी अनेकांना आवडतं. एकदा का उस्मानाबादी बोकडाला लसीकरण केलं की, त्याची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते. त्यामुळे ते मटण खाण्यासाठी अत्यंत निरोगी असतं. तसेच त्या बोकडाचं मटण 32 ते 36 किलोच्या असतं. यामुळे लोकांना उस्मानाबादी बोकडाचं मटण अधिक आवडतं.