मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha )
प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भ के लिए मौसम का पूर्वानुमान और चेतावनी दिनांक 13.04.2021 pic.twitter.com/lN8xhO8XkM
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) April 13, 2021
Next 48 hours many parts of Interior Maharashtra will get rains & thunderstorms during evening/night. Mumbai especially regions east of Mumbai also have small chance of light rains.
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) April 14, 2021
मंगळवारी दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर, हिगोली, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. कोल्हापुरात अनेक भागात
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले तसेच हायस्कूलच्या इमारतीचेही मोठं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अहमदनगर शहरासह ग्रामिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने कांद्याच नुकसान होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाबरोबर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांचे झाली माती. ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू ,कडबा यांचे अतोनात नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी बेदाणा शेड उडून गेल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.
संबंधित बातम्या:
कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा
(Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha)