नांदेड: शेतीमध्ये नवनवीन संशोधन होत असल्यानं पिकांचे नवीन वाण येत आहेत. मात्र, काही शेतकरी पांरपांरिक वाणांची निवड करत असल्याचे दिसून येते. नांदेडमधील माधव पावडे या शेतकऱ्यानं गावरान कारल्याच्या लागवडीद्वारे चांगलं उत्पन्न मिळवलेय. तर, श्याम घुमे या शेतकऱ्यानं हळदीवर कंदमाशीचा परिणाम होऊन नये म्हणून एरंडीची लागवड करुन दुहेरी लाभ मिळवला आहे. (Nanded Farmer success story of Bitter Melon farming)
गावरान कारल्याच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न
नांदेड तालुक्यातील पावडेवाडी येथील माधव पावडे यांनी कारल्याची यशस्वीपणे शेती केली आहे. पावडे यांनी एक एकर क्षेत्रावर यांनी गावरान कारल्याची लागवड केली. अनेक व्याधींवर रामबाण उपाय म्हणून गावरान कारले प्रसिद्ध आहे. त्यामुळे कारल्याला बाजारात कायमस्वरूपी चांगली मागणी असते. औषधी गुणधर्मामुळं गावरान कारल्याला भाव ही चांगला मिळतो.
माधव पावडे यांना कारल्याच्या शेतीचा चांगलाच फायदा होतोय. गावरान कारल्याच्या विक्रीतून कुटुंबाची आर्थिक स्थिती सावरण्यास चांगलीच मदत झाली आहे. या कारल्याच्या शेतातून पावडे यांना वर्षाला दोन लाख रुपयांचे उत्पन्न होतेय. यामुळं पावडेंना प्रपंच चालवण्यास मदत होतेय. (Nanded Farmer success story of Bitter Melon farming)
नांदेडच्या कंधार तालुक्यातील संगुचीवाडी गावातील श्याम घुगे या शेतकऱ्यानं हळदीवरील कीड रोखण्यासाठी भन्नाट कल्पना वापरली आहे. हळद पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून श्याम घुगे या शेतकऱ्याने एरंडीच्या झाडांचा वापर केलाय. हळद पीक असलेल्या शेतांच्या बांधावर एरंडीच्या झाडाची लागवड केल्यास कंदमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो. तर, एरंड तेल हळद पीक असलेल्या शेतात ठेवले तर अन्य कीड देखील नाहिशी होते.
एरंडीच्या झाडांपासून चांगले उत्पन्न होत असल्याचे श्याम घुमे या शेतकऱ्यांने सांगितले. एरंडीच्या झाडाचा या शेतकऱ्यांने केलेला वापर पाहण्यासाठी त्याच्या संगुचीवाडी या गावातील शेतात अनेक शेतकरी भेट देत आहेत.
महाराष्ट्रातील शेतीविषयक घडामोडी: पपईला विषाणूजन्य रोगाचा फटका, कांदा, संत्र्याच्या भावात घसरण#agriculturenews #farmernews #maharashtra #agriculture @dadajibhuse https://t.co/R2cimrBANO
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात
(Nanded Farmer success story of Bitter Melon farming)