जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील पाऊस लांबल्याने ‘मे’ महिन्यात लागवड कारण्यात आलेले कापसाच्या पीक (cotton crop) धोक्यात आले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. वाढते तापमान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे कपाशीची कोवळी रोपे करपत आहेत. मात्र वरुणराजा कधी बरसणार याकडे बळीराजा वाट पाहत आहे. शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच वरुणराजा बरसण्यात उशीर करता असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडतो का काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना (Angicultural news in marathi) केलेला खर्च देखील निघत नाही आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वाशिम जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने जिल्ह्यात पेरणीला विलंब होत आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली, असून १७ जून अखेर जिल्ह्यात कुठेही पेरणीलायक पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले पाहायला मिळत आहे.
पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला, तरी तळकोकणात अजून ही पावसाची हुलकावणी सुरू आहे. काल दुपारनंतर जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावून लागलीच दडी मारली. आज ही सकाळी सकाळीच जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने शिडकावा केला. तळकोकणात ७ जून पासून सक्रिय होणारा मान्सून १८ तारीख आली, तरी सक्रिय झालेला नाही. त्यामुळे बळीराजाला चिंतेने ग्रासले आहे. आज काही प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडला असला, तरी देखील शेतकरी वर्ग अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. पावसाचे सातत्य राहिल्याशिवाय शेतीच्या कामांना सुरवात करता येत नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागून राहीले आहेत.
अमरावतीमध्ये अनधिकृत कापसाचे एचटीबीटी बोगस बियाणे विक्री करीत असताना सापडले आहेत. कृषी विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलीसांनी त्यांच्यावर संयुक्त कारवाई केली आहे. एक एजंट गावागावात चारचाकीने शासन मान्य नसलेले बोगस बियाणे विक्री करताना रंगेहाथ सापडला. यावेळी एकूण 422 पाकीट बोगस बियाणे अंदाजे 4 लाख रुपयांचे बियाण्यासह 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अमरावती येथील अशोक भाटे (वय 37) असं आरोपीचं नावं आहे.