नंदुरबार: स्ट्रॉबेरीचे नाव घेतलं की आपल्याला क्षणात महाबळेश्वरची आठवण होते. तिथे मिळणाऱ्या रसाळ आणि अवीट चवीच्या स्ट्रोबेरीचा स्वाद आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. मात्र, आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला टक्कर देण्यासाठी सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. या भागात काही शेतकरी स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. विशेष म्हणजे गाजावाजा न करता त्यांचा हा प्रयोगशील उपक्रम त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळवून देत आहे. त्याच्या समोर सर्वात मोठी समस्या होती ती मार्केटिंग आणि पॅकिंग ची आदिवासी विकास विभागाने अनुदान दिल्याने ती समस्यादेखील सुटली आहे. त्यामुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. (Nandurbar Padavi Brothers successfully done Strawberry farming)
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगामध्ये वसलेलं दाब हे थंड हवेचे ठिकाण आहे.दाब हे छोटस गाव असून अनेक पाडे मिळून या गावाने आकार घेतला आहे. सामन्यापेक्षा या भागात तापमान बऱ्यापैकी कमी असते. सातपुड्याच्या उंचावर हा भाग असल्याने येथे नेहमी थंड वातावरण राहते. याच वातावरणच फायदा घेत येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षापसून हे शेतकरी यशस्वी स्ट्रॉबेरी लागवड करून लाखोंचा नफा कमावत आहेत
धिरसिंग पाडवी आणि टेड्या पाडवी या भावांनी यांनी अडीच एकर क्षेत्रावर स्ट्रोबेरीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन स्वतः रोपे तयार करण्याचं प्रशिक्षण घेतले. सातपुड्यातील आपल्या अति दुर्गम भागातील गावात येऊन अडीच एकर मध्ये रोपे तयार करून लागवड केली आहे. यासाठी त्यांनी अवघा 15 हजार खर्च केला आहे. त्यांना स्ट्रोबेरी लागवडीतून कमीत कमी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. आधुनिक पद्धतीनेच स्ट्रोबेरीचे उत्पन्न घेत असल्याने आणि शेतात काम करणारी सर्व माणसं घरची असल्याने पाडवी यांची स्ट्रॉबेरी शेती जगण्याचा आधार बनली आहे.
आम्ही आमच्या शेतीत पारंपारिक पद्धतीने उत्पन्न घेत असल्याने आम्हाला मिळणारे उत्पादन कमी होते. रोजगाराच्या शोधात आम्हाला बाहेर जावे लागत होते. आता पारंपारिक पिके सोडून स्ट्रॉबेरी उत्पन्न घेत आहोत. त्यातून चांगला फायदा होत आहे, असं धिरसिंग पाडवी या शेतकऱ्यानं सांगितले. टेड्या पाडवी स्ट्रॉबेरी शेतीविषयी सांगतात, आमचे पूर्वज ये पारंपारिक भगर, मका, ज्वारी ही पिके घ्यायचे. आम्ही पण घेत होतो त्यामुळे आम्हाला होणारा फायदा कमी होता. आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे आम्ही गावातच लाखो रुपये कमवू शकत आहे.
आदिवासी विभागानं पँकिंगचा प्रश्न सोडवला
पाडवी बंधुंना स्ट्रॉबेरी विकण्यासाठी बाजार पेठची सर्वात मोठी समस्या होती. स्थानिक बाजाराच्या ठिकाणी ते स्ट्रॉबेरी विक्रीसाठी घेऊन जात होते. शहरातील बाजारपेठ उपलब्ध करणे गरजेचे असल्याने आणि त्यासाठी योग्य पॅकिंग असणे आवश्यक होते. आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयाच्यावतीने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना पॅकिंगसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सातपुड्यातील स्ट्रॉबेरी मोठ्या शहरातील बाजारपेठा गाजवत आहे, असं प्रकल्प अधिकारी आविशांत पांडा यांनी सांगितलेय.
सातपुड्यातील दाब येथील कसदार आणि रसाळ स्ट्रोबेरीचा डंका आता हळूहळू सर्वत्र गाजू लागला आहे. रडत कुढत न बसता हवामान, उपलब्ध साधनाचा जोरावर आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवड सातपुड्यात यशस्वी करून दाखवली आहे. अल्पशिक्षित आदिवासी बांधव प्रयोगशील शेती करून शकतात तर आपण का नाही ? याचा विचार अन्य शेतकऱ्यांनी करणं गरजेचे आहे.
महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं! https://t.co/Wpk2iRFQoD
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2019
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!
(Nandurbar Padavi Brothers successfully done Strawberry farming)