या जिल्ह्यात पाणी जपून वापरण्याचं आवाहन, लवकर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखडा येणार

| Updated on: Apr 01, 2023 | 11:49 AM

मागच्या पंधरा दिवसापुर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा हवालदील झाला आहे.

या जिल्ह्यात पाणी जपून वापरण्याचं आवाहन, लवकर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखडा येणार
nandurbar
Image Credit source: tv9marathi
Follow us on

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर हा पाणीसाठा (water reservoir) आता कमी होण्यास सुरुवात झाली असून मध्यम प्रकल्पांमध्ये ६८ तर लघू प्रकल्पांमध्ये ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर (water crisis) देखील परिणाम होणार आहे. सध्यातरी कुठल्याची प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही आहे. परंतु येणाऱ्या काळात पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीचा मध्यम प्रकल्प विभागाकडून नुकताच आढावा घेण्यात आला. या आढाव्यात पाणी पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे, तर प्रशासनाने लवकर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या कांद्याला सहा ते सात रुपये किलो दराने घाऊक बाजारपेठेत विक्री केलेला कांदा सामान्य ग्राहकांना मात्र १५ ते २० रुपये किलो याप्रमाणे खरेदी करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा तोटा आणि व्यापाऱ्यांचा फायदा होताना दिसत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च वजा केला असता कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव देणार असं घोषणा करत आहे. परंतु शेतकऱ्याला कांद्याला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. ज्याप्रमाणे व्यापाऱ्याला चांगला भाव मिळत आहे. तसाच शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे एवढी अपेक्षा शेतकरी राजा करत आहे.

हे सुद्धा वाचा

मागच्या पंधरा दिवसापुर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा हवालदील झाला आहे. सरकारकडून फक्त पंचनामे झाले असून आतापर्यंत कसल्याची प्रकारची मदत मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.