Success story : दूध विक्रीतून तीन रुपये मिळायचे, आता आहे ८०० कोटींचा डेअरी व्यवसाय, कसा केला हा चमत्कार?

| Updated on: May 06, 2023 | 8:46 AM

१९७५ मध्ये करनालच्या एनडीआरआयमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीत त्यांना बीएसस्सी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी कोर्सची फी २५० रुपये होते. नारायण यांच्यासाठी ती खूप होती.

Success story : दूध विक्रीतून तीन रुपये मिळायचे, आता आहे ८०० कोटींचा डेअरी व्यवसाय, कसा केला हा चमत्कार?
Follow us on

नवी दिल्ली : १९७५ वं वर्ष. १७ वर्षांचा मुलगा दूध विकण्यासाठी निघाला. हरियाणातील करनाल येथे नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टिट्यूटच्या परिसरात एका बुधवर तीन रुपये कमावले. हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला. अभ्यास करून हा मुलगा पार्ट टाईम दूध विकत होता. यानंतर २२ वर्षांनी त्याने डेअरी कंपनी सुरू केली. दूध गोळा करण्यासाठी आपल्या सायकलनं घरोघरी जात होते. त्यांचं नाव आहे नारायण मजूमदार. मजूमदार रेड काऊ डेअरीचे मालक आहेत. ही पूर्व भारतातील मोठ्या डेअरीपैकी एक आहे. ही कंपनी दही, तूप, पनीर आणि रसगुल्ला यासह इतर दुधाचे पदार्थ विक्री करते.

प्राथमिक शिक्षण गावात

नारायण मजूमदार यांचा जन्म २५ जुलै १९५८ मध्ये पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात झाला. तीन भाऊबहिणींमध्ये ते दुसऱ्या नंबरचे आहेत. त्यांचे वडील बिमलेंदू मजूमदार शेतकरी होते. आई बसंती मजूमदार गृहिणी होत्या. नारायण यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले.


दोन तास दूध विक्रीतून मिळायचे रोज तीन रुपये

१९७५ मध्ये करनालच्या एनडीआरआयमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीत त्यांना बीएसस्सी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी कोर्सची फी २५० रुपये होते. नारायण यांच्यासाठी ती खूप होती. शुल्क भरण्यासाठी ते फर्स्ट इअरच्या पूर्वी दोन महिने इंस्टिट्यूटमध्ये पार्ट टाईम जॉब करत होते. सकाळी ५ ते सात दूध विकत होते. यातून त्यांना रोज तीन रुपये मिळायचे. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारकडून १०० रुपये शिष्यवृत्ती मिळत होती. वडील घरून १०० रुपये पाठवत होते. १९७९ ला डिग्री मिळाली. या सर्व परिस्थितीत कुटुंबीयांना एक एकर जागा विकावी लागली.

हे सुद्धा वाचा

दुधाच्या गुणवत्तेवर दिला भर

डिग्री पूर्ण झाल्यानंतर मजूमदार यांना कोलकाता येथे डेअरी केमिस्ट म्हणून नोकरी मिळाली. तेव्हा त्यांचा पगार ६१२ रुपये होता. १९८१ रोजी त्यांनी मदर डेअरीत काम करणे सुरू केले. १९९५ मध्ये मजूमदार हावडा येथे ठाकेर डेअरी प्राडक्समध्ये सल्लागार व्यवस्थापक झाले. ही डेअरी शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत होती. नारायण मजूमदार यांनी दुधाच्या गुणवत्तेवर भर दिला.

रेड काऊ डेअरीची स्थापना

१९९९ मध्ये दहा लाख रुपये खर्च करून त्यांनी दुधाचा चिलिंग प्लांट सुरू केला. २००० मध्ये त्यांनी ठाकेरकडून चिलिंग युनिट खरेदी केला. ५०० लीटरच्या क्षमतेचा मिल्क टँक खरेदी केला. २००३ मध्ये मजूमदार यांनी ठाकेर डेअरी सोडून रेड काऊ डेअरी नावाची कंपनी सुरू केली. २००७ मध्ये नारायण यांचा मुलगा नंदनही या व्यवसायात आला. रेड काऊ डेअरीच्या तीन प्रोडक्शन कंपन्या आहेत. एक हजारांपेक्षा जास्त लोकांना त्यांनी रोजगार दिला. पश्चिम बंगालच्या १३ जिल्ह्यात तीन लाख शेतकरी त्यांच्याशी जुळले आहेत. कंपनीचा व्यवसाय ८०० कोटींपेक्षा जास्त आहे. हे वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे.