कृषी आयुक्त थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ; मदत कधी होणार?

| Updated on: Apr 10, 2023 | 11:49 AM

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त संजय चव्हाण हे नाशिक दौऱ्यावर आले असून स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे.

कृषी आयुक्त थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ; मदत कधी होणार?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : रविवारी सायंकाळपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, गहू आणि डाळिंब यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा आणि द्राक्ष या पिकांना लाखो रुपये खर्च करून विक्री तर कुठे काढणीला आलेले पीक भुईसपाट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त संजय चव्हाण स्वतः नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. कृषी मंत्री अचानक दौऱ्यावर आल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ झाली आहे. नाशिकच्या कसमादे परिसरात कृषी आयुक्त स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. यामध्ये आत्तापर्यन्त मिळालेल्या माहितीनुसार 34 हजार हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

कृषी आयुक्त संजय चव्हाण हे स्वतः नाशिकच्या विविध भागात जाऊन पाहणी करणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहून मदत बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही संजय चव्हाण यांनी म्हंटलं आहे. राज्यातील जवळपास 34 हजार हेक्टरवरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

सटाणा भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामध्ये कांद्याचे आणि द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. यामध्ये निफाडसह बाजूच्या तालुक्यात द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चांदवड आणि येवला तालुक्यात कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावलेले डोंगळे देखील खराब झाले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर आकडेवारी समोर येईल, लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव आणि वणी येथे पाहणी करणार असल्याचे म्हंटले असून कृषी अधिकाऱ्यांना घेऊन आयुक्त रवाना झाले आहे. अचानक संजय चव्हाण यांनी दौरा केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती पाहून कृषीमंत्री अधिकाऱ्यांना घेऊन पंचनाम्याच्या बाबत आदेश देणार आहे. त्यामध्ये तलाठी आणि कृषी अधिकारी तात्काळ पंचनामा करतील अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली आहे. मात्र झालेले नुकसान बघता शेतकरी पूर्णतः कोलमडला गेला आहे.

द्राक्ष बागा उन्मळून पडले आहे. भुईसपाट झालेले बाग बघू शेतकरी अश्रु ढाळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान बघता मदतीची मागणी करत असतांना आता कृषी आयुक्त पाहणी करून झाल्यावर काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळिराला काय मदत होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.