नाशिक : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. मात्र, सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. प्रयोगशील शेतकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ओळख आहे. त्यात महाराष्ट्रातील नगदी पिके घेण्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच अग्रेसर असतो. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे कांदा, द्राक्ष, डाळिंब, ऊस, गहू, सोयाबीन यांसह फळभाज्या आणि भाजीपाला यांचं मोठं उत्पादन घेतलं. मात्र, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊसातही तसंच घडलं आहे. राज्यातील सर्वाधिक अवकाळी पाऊसाचा फटका नाशिकच्या शेतकऱ्यांना बसला असून मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
एप्रिल महिण्यात झालेल्या अवकाळी पावसाचा राज्यात सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने सर्वाधिक 30 हजार हेक्टरहून अधिक कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत राज्याच्या कृषी विभागाने माहिती दिली दिली आहे.
या नुकसानीमुळे ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये कांद्याची कमतरता भासू शकते. या अवकाळीमुळे 55-56 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त उन्हाळ कांद्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. देशातील एकूण उन्हाळी कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के आहेत.
तर राज्यात नाशिकचा वाटा सर्वाधिक 50 टक्के आहे. देशात कांद्याच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकाऱ्यांकडे कांदा आहे त्यांच्यासह ज्या कांदा व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे त्यांना मोठा फायदा होणार असून नुकसान भरून निघू शकते.
कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. कांदा पीक घेण्यात नाशिक जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यामुळे कांदा पीक घेतले जाते. त्यात अवकळी पाऊस सर्वाधिक नाशिकला झाला आहे.
अवकाळी पाऊस पडल्याने काढणीला आलेला कांदाही खराब झाला आहे. साठवण क्षमता कांद्याची कमी झाली असून चाळीत साठवून ठेवता येणार नाहीये. त्यामुळे दिवाळीच्या दरम्यान येणारा कांदा भाव खाऊन जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहणार नाही.
त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात त्यावेळेला वाढतील, मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल याची शास्वती फार कमी असून व्यापऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे अवकाळीचा फेरा शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठ्या आर्थिक संकटात टाकणारा असल्याने सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.