नाशिक: कोरोनाचा कहर देशासह विदेशात सुरू असून सर्वच क्षेत्र प्रभावित झाली आहेत. मात्र, द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातून दीडशे टन द्राक्षांची निर्यात करण्यात आलीय. दीडशे टन द्राक्ष बांग्लादेशात पाठवण्यात आली आहेत. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्टेशन असलेल्या येवला तालुक्यातील नागरसुल रेल्वे स्थानकातुन विशेष किसान रेल्वेचा वापर करण्यात आला. निफाड तालुक्यातील व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी विशेष प्रयत्न करत शेतकऱ्यांना 40 ते 45 लाख रुपये मिळवून दिले. (Nashik Nifad Traders and Farmers export grapes to Bangladesh via Kisan Railway)
दक्षिण मध्ये रेल्वेच्या नागरसुल रेल्वे स्थानकातून प्रथमच द्राक्षांची विशेष किसान रेलच्या माध्यमातून निर्यात करण्यात आली. 40 ते 45 लाख रुपयांचे दीडशे टन द्राक्षांची निर्यात बांगलादेशाला करण्यात आली. किसान रेल्वे थेट बांग्लादेश बॉर्डर पर्यंत जाते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांना व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या निफाड, लासलगाव स्थानकातून विशेष किसान रेल उपलब्ध न झाल्याने नागरसुल येथून द्राक्षांची निर्यात करण्यात येते आहे.
लासलगाव येथे विशेष किसान ट्रेन उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची वाचणार एका ट्रक मागे पंधरा ते वीस हजार रुपये वाचणार आहेत. ट्रकने द्राक्ष बांग्लादेशात पाठवण्यास अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च लागतो.मात्र, रेल्वेने पाठवल्यास दीड लाख रुपये लागतात. रेल्वेने बांग्लादेश बॉर्डर पर्यंत पोहोचण्यासाठी तीस तासांचा लागतो तर ट्रकने पन्नास तासाहून अधिक वेळ लागतो. परवानगी मिळाल्यास थेट बांग्लादेशातील ढाकापर्यंत विशेष किसान रेल गेल्यास अवघ्या 36 तासात द्राक्ष बांगलादेशात पोहोचणार आहेत. लासलगाव, निफाड रेल्वे स्थानकातून एसी विशेष किसान रेल्वे मिळावी तसेच बांगलादेशातील ढाका पर्यंत रेल्वे जाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं द्राक्ष निर्यातदार व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी सांगितलं.
कोरोना संसर्गाच्या प्रदूर्भावात पुन्हा वाढ होत आहे. देशासह विदेशात लॉकडाऊन जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने 80 ते 100 किलो दराने विकल्या जाणाऱ्या निर्यातक्षम द्राक्षांना अक्षरशः 30 ते 35 रुपये किलो दर मिळत आहे. मागील वर्षी लॉकडाऊन असल्याने किलोला 5 ते 10 रुपये दराने द्राक्ष विक्री करण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली होती.
आर्थिक संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी नामदेव पानगव्हाणे यांनी प्रयत्न केले. निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष निर्यातदार व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी 40 ते 45 लाख रुपयांचे दीडशे टन द्राक्ष बांग्लादेशला पाठवले. अनेक अडचणींवर मात करत बांग्लादेशातील ढाका येथे पाठवत पानगव्हाणे यांनी दमदार कामगिरी करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली.
किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलंय, 31 मार्चपूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल मोठा फटकाhttps://t.co/G0sPhSuqHp#KCC | #PMkisan | #Kisancreditcard | #KCCloan
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले
(Nashik Nifad Traders and Farmers export grapes to Bangladesh via Kisan Railway)