केंद्र सरकारने पीएम किसान अॅपमध्ये फेस अथॉरायझेशन फीचर लाँच केले आहे. केंद्राच्या कल्याण योजनेत असं फीचर पहिल्यांदा लाँच झाले. या नव्या फीचरमध्ये वन टाईम पासवर्ड किंवा फिंगर प्रींटऐवजी मोबाईल फोनवर आपला चेहरा स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एका अॅपच्या माध्यमातून हे फीचर लाँच केले.
नवे फीचर पीएम केवायसी योजनेत फेस अथॉरायझेशन मोबाईलच्या माध्यमातून ई केवायसी करता येणार आहे. हा अॅप त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहील जे ज्येष्ठ आहेत आणि ज्यांना मोबाईल आधारला लिंक नाही.
मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी पीएम-किसान मोबाईल अॅपमध्ये फेस अथॉरायझेशन फीचरची टेस्ट सुरू केली गेली. तेव्हापासून आतापर्यंत ३ लाख शेतकऱ्यांचे ईकेवायसी झाले आहेत. आतापर्यंत पीएम-किसान पीएम किसान लाभार्थ्यांचे केवायसी बायोमॅट्रिक पद्धतीने केले जात होते. आधारशी संबंधित मोबाईल फोन नंबरवर पाठवले जात होते. वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून हे काम केले जात होते.
फेस अथॉरायझेशनसाठी सर्वात पहिले गूगल प्ले स्टोअरवरून अॅप डाऊनलोड करावा.
याशिवाय फेस आरडी अॅड डाऊनलोड करावा लागेल.
किसान योजनेच्या अॅपवर लॉगीन करावे. त्यात लाभार्थ्याचे नाव टाईप करावे आणि आधार नंबर लिहावा.
आधारशी लिंक नंबरवर एक ओटीपी येईल. त्याला यात भरावे
आता एक एमपीन सेट करून सबमीट करावे
हे केल्यानंतर तुमच्याजवळ दोन ऑप्शन राहतील. डॅशबोर्ड आणि लॉगआऊट
डॅशबोर्डवर क्लीक केल्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स दिसेल. येथे फेस अथॉरायझेशन फीचर ओपन होईल.
तुम्ही केवायसीच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून फेस अथॉरायझेशन करू शकता.