मुंबई : (Eknath Shinde) शिंदे गट आणि (BJP) भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र हे सुरुच आहे. गुरुवारी सायंकाळी विविध क्षेत्रातील कामांचा आढावा घेताना रखडलेल्या (Agricultural Scheme) कृषी योजना मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला जागतिक बॅंकेने 3 हजार कोटांचे सहकार्य केले आहे. त्यामुळे निधीची चिंता नाही. आगामी काळात हे काम जलदगतीने पूर्ण व्हावेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. तर मध्यंतरी हे काम कोरोनामुळे रखडले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असली
केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ज्या कृषि योजना आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय वेळेत योजना मार्गी लागल्या तर त्यामधील निधीही परत जात नाही. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा महत्वाचा आहे. त्यामुळे याला गती दिली तरी शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने 3 हजार कोटींपर्यंतचा निधी दिला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ 15 कोटी निधी खर्ची झाल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर दरम्यानच्या काळात कोरोनामुळे या योजनेतील कामांना गती मिळाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली नाहीतर प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर भर दिला.