पुणे : (Chemical Fertilizer) रासायनिक खतांच्या वापराबद्दल केंद्र सरकारचे निर्बंध येत असले तरी याच कंपन्यावर दुसरीकडे महत्वाच्या जबाबदारीचे ओझे ठेवण्यात आले आहे. देशातील रासायनिक खत कंपन्यांनी आता (Organic Fertilizer) सेंद्रिय खताचाही पुरवठा करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे रासायनिक खतांचा वापर तर कमी होणार आहेच शिवाय जमिनीची सुपिकता वाढवण्याच्या अनुशंगाने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नद्रव्य व्यवस्थनामध्ये सतुलन राहणार आहे तर यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल असा विश्वास (Agricultural Department) कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खत कंपन्यांना आता रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचीही निर्मिती करावी लागणार आहे. या निर्णयामुळे धोरणामध्येही बदल करण्यात आला आहे.
सध्या खरीप हंगामाच्या अनुशंगाने लिंकिंग पध्दत नव्याने समोर येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ज्या खताची मागणी आहे त्याचबरोबर इतर खताची खरदी ही अनिवार्य़ केली जात आहे. पण रासायनिक खताबरोबर जैविक खते विकण्याचा प्रयत्न झाला तर तो काही लिंकिंग असे म्हणता येणार नाही असे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने केंद्राने वेगळ्या पध्दतीने प्रयत्न केला असला तरी यामुळे जमिनीची सुपिकता होणार आहे.
रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताची केवळ नियोजनच नाहीतर कंपन्यावर तशी सक्ती करण्यात आली आहे. यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापनात संतुलितपणा येणार आहे तर काळाच्या ओघात रासायनिक खताची जागा सेंद्रिय खत घेईल असा विश्वास आहे. केंद्राच्या या धोरणाला खत उत्पादन ते विक्रेता या साखळीतील प्रत्येक घटकाने पाठिंबा दिल्यास हा प्रयोग यशस्वी होणार आहे. त्याअनुशंगाने केंद्राचे प्रयत्न असून यासंदर्भात खत कंपन्याबरोबर धोरणही ठरले आहे.
शेतजमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करावा असे आवाहन कायम सरकारकडून केले जात आहे. मात्र, उत्पादनवाढीसाठी शेतकरीही याकडे दुर्लक्ष करतात. पण आता खताच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या धोरणात बदल केल्याने सेंद्रिय खताचा वापर वाढेल असा विश्वास आहे. त्यामुळे जमिनीचा दर्जाही सुधारेल आणि रासायनिक खताचा वापरही कमी होईल असा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे. शेती व्यवसाय आणि उत्पादनाच्या दृष्टीने दुरगामी परिणाम होईल असा हा निर्णय आहे.