आता गुरांच्या चाऱ्याची समस्या मिटणार, पाण्यावर उगवा चारा, या कृषीविद्यापीठाचे संशोधन

| Updated on: Apr 23, 2023 | 1:28 PM

एका सर्व्हक्षणानूसार गोवा आणि बिहारच्या शेतकऱ्यासाठी अधिक फायदा यामुळे मिळणार आहे. बिहारच्या ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या जमीनी नाहीत त्यांनाही आता वर्षभर चारा मिळण्याची गॅरंटी मिळाली आहे.

आता गुरांच्या चाऱ्याची समस्या मिटणार, पाण्यावर उगवा चारा, या कृषीविद्यापीठाचे संशोधन
hydroponics grass
Image Credit source: socialmedia
Follow us on

भागलपूर : शेतीचा व्यवसाय बिनभरोशाचा झाल्याने आता गुरांच्या चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना पिकांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे आता बिहारच्या भागलपुरच्या बिहार कृषि विद्यालयाने सबौर येथे देशातील दुसरा यशस्वी प्रयोग केला आहे. या प्रयोगाने शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. आता शेतकऱ्यांना गुरांच्या चाऱ्यासाठी शेतीवर अवलंबून रहावे लागणार नाही. आता नव्या हायड्रोपोनिक्स तंत्राने पाण्यावरत हिरवागार चारा पिकवता येणार आहे. या प्रयोगाने गुरांच्या चाऱ्यांची समस्या मिटणार आहे.

बदलत्या ऋतूमानामुळे शेतीचा धंदा आता बिनभरोशाचा झाला आहे. कधी अवकाळी कधी अतिवृष्टी तर कधी गारपीठ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतीमध्ये खूपच अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुरांना चारा आणायचा कोठून हा बळीराजापुढे मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. आता बिहारच्या डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी बिहार कृषी विद्यापीठाने नव्या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे चारा पिकविणे सोपे बनले असून या चाऱ्यांमध्ये अधिक पोषक तत्वे असल्याने दुभती जनावरे जास्त दूध देणार आहेत. पुरजन्य गावांमध्येही हायड्रोपोनिक तंत्राचा फायदा होणार आहे. एका सर्व्हक्षणानूसार गोवा आणि बिहारच्या शेतकऱ्यासाठी अधिक फायदा यामुळे मिळणार आहे. बिहारच्या ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या जमीनी नाहीत त्यांनाही आता वर्षभर चारा मिळण्याची गॅरंटी मिळाली आहे. तर शहरी क्षेत्रातील डेअरी फार्म तसेच पशुपालकांनाही यामुळे लाभ होणार आहे.

केवळ 60 चौरस फूट जागेत 8 गुरांचा चारा

बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांच्या चाऱ्यासाठी शेती चक्रावर अवलंबून रहावे लागते. परंतू या संकटावर मात करण्यासाठी आता बिहार कृषि विश्वविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. बिहारच्या कृषी विद्यापीठाचे संशोधक आणि हायड्रोपोनिक्स प्रकल्पाचे प्रमुख डॉ. संजीव कुमार गुप्ता यांनी सांगितले की केवळ 60 चौरस फूट जागेत आठ गुरांना पुरेल असा हिरवा चारा दर दिवशी तयार केला जाऊ शकतो.

चाऱ्यात तब्बल 18 टक्के प्रोटीन

हा चारा खूपच पोषक असून त्यात तब्बल 18 टक्के प्रोटीन आहे, तसेच तो गुरांना विविध आजारांपासून दूर ठेवतो. तसेच किटकनाशकावर होणारा खर्चही वाचवतो. पारंपारिक चाऱ्यात केवळ 8 ते 9 टक्के प्रोटीन असते. तर यात 18 टक्के प्रोटीन असल्याने जनावरांचे दूध 40 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढते.

पारंपारिक पद्धतीत 50 ते 60 लिटर पाणी लागते. तर यात केवळ 2 ते 3 लिटर पाणी लागेल. कृषी विद्यापीठाचे कुलपती डी.आर.सिंह यांनी सांगितले की बिहार कृषी विद्यापीठाने हायड्रोपोनिक तंत्राने चारा पिकविण्यासाठी चांगली सुरूवात केली आहे. लवकरच आम्ही युवकांना याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात करणार आहे.