दोन भावांनी सुरू केली सर्वात महाग आंब्याची शेती, या एक किलो आंब्याची पाहून आश्चर्य वाटेल

| Updated on: May 22, 2023 | 10:08 PM

औषधी गुणधर्म असल्यामुळे मियाजाकीला एग ऑफ सन म्हणतात. खूप गोड, सोनेरी लाल आणि पिवळ्या रंगाचा आहे.

दोन भावांनी सुरू केली सर्वात महाग आंब्याची शेती, या एक किलो आंब्याची पाहून आश्चर्य वाटेल
Follow us on

नवी दिल्ली : जामताडा जिल्हा अम्बा गावात राहणारे अरींदम चक्रवर्ती आणि अनिमेष चक्रवर्ती यांनी आपल्या बगीच्यात मियाजाकी प्रजातीचे सात झालं लावली. त्यापैकी तीन झाडांना फळं लागली आहेत. जामताडा जिल्हा सध्या चर्चेत आहे तो या वेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या लागवडीमुळे. सर्वात महाग जातीचे आंबे येथे लागले आहेत. या आंब्याची किंमत हजारात नाही, तर लाखात आहे. ही आंब्याची दुर्मिळ प्रजाती आहे. या जातीचं नाव आहे मियाजाकी. या शेतीची सुरुवात जपानमध्ये झाली होती. परंतु, आता जामताडाच्या दोन भावांनी या प्रजातीच्या आंब्याची लागवड केली.

जामताडा जिल्ह्यातील अम्बा गावात राहणाऱ्या अरींदम आणि अनिमेष चक्रवर्ती या भावांनी दुर्मिळ अशा आंब्याची लागवड केली. यामुळे हे गाव देशाच्या नकाशावर आहे. शेती करणारे शेतकरी देशासमोर उदाहरण ठरले. आंतरराष्ट्रीय बाजारात मियाजाकीच्या एक किलो आंब्याची किंमत २ लाख ७० हजार रुपये आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे मियाजाकीला एग ऑफ सन म्हणतात. खूप गोड, सोनेरी लाल आणि पिवळ्या रंगाचा आहे.


बगीच्यात ४० पेक्षा जास्त व्हेरायटी

जामताडा जिल्ह्यात अरींदम आणि अनिमेष यांनी मियाजाकी प्रजातीचे सात झाडं लावले. त्यापैकी ३ झाडांना आंबे लागले. मियाजाकी आंब्याव्यतिरिक्त ४० पेक्षा जास्त आंब्याच्या व्हेरायटीज लावल्या आहेत. यात प्रामुख्याने अल्फांसो, आईवेरी, बनाना मँगो, पोटल मँगो यासारख्या प्रजाती आहेत.

हे सुद्धा वाचा

एका आंब्याची किंमत दीड ते दोन हजार रुपये

मियाजाकी आंब्याचे उत्पन्न काढणारे भारतीय शेतकरी म्हणाले, एका आंब्याची किंमत दीड ते दोन हजार रुपये आहे. झारखंड विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो म्हणाले, या दोन्ही भावांनी दुर्मिळ आंब्याची लागवड करून या परिसरात नाव कमावले आहे. राज्यातील इतर शेतकऱ्यांनी असे प्रयोग करावे, अशी इच्छा व्यक्त केली.

अरींदम आणि अनिमेष यांचा बगीचा पाहण्यासाठी लोगं दूरदूरून येतात. मियाजाकी आंब्याची शेती कशी करतात, याचे मार्गदर्शनही ते करत आहेत.