पुणे : (Onion Rate) कांदा दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. दरवर्षी (Summer Crop) उन्हाळ्यात कांद्याचे दर वाढतात पण यंदा परस्थिती बदलले आहे. खरिपातील लाल कांद्याची आवक संपल्यानंतर सुरु झालेली घसरण अद्यापही कायम आहे. खरीप हंगामात कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा आणि (Nurturing environment) पोषक वातावरणाचा फायदा घेण्याचा निर्धार केला. सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाले असताना दरातील लहरीपणामुळे पुन्हा वांदा झाला आहे. खेड तालुक्यातील चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढत आहे पण दिवसाकाठी दरात घसरण ही सुरुच आहे. दोन दिवसांमध्येच कांद्याचे दर हे 100 रुपयांनी घसरले आहेत.
उत्पादनात वाढ झाल्याने यंदा कांदा निर्यातीमधूनही उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शिवाय कांद्याचे दर वाढताच मध्यंतरी केंद्र सरकराने साठवणूकीतला कांदा राज्यातील मुख्य मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दर नियंत्रणात ठेवले होते. त्याचाही परिणाम थेट वाढत्या दरावर झाला होता. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी नाही आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्च काढणेही मुश्किल झाले आहे.
सध्या बाजारपेठेत उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु आहे. पोषक वातावरणामुळे कांदा चांगला पोसलेला आहे. शिवाय चमकही आहे असे असतानाही मागणीच नसल्याने कांदा दरात दिवसेंदिवस घट होत आहे. खेड तालुक्यातील चाकण मार्केटमध्ये दिवसाकाठी 10 हजार गोण्यातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याला प्रति क्विंटल 700 ते 1 हजार दरम्यानचे दर मिळत आहेत. शिवाय कांदा दराची आवक वाढली तर दरात आणखीन घसरण होईल असा अंदाज आहे. खरीप हंगामात उत्पादन घटले तर विक्रमी दर मिळाला होता. तर आता उन्हाळी हंगामात यापेक्षा उलटी परस्थिती निर्माण झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असताना 3 हजार 500 रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता. यामुळे सोलापूर, लासलगाव या मुख्य बाजारपेठांचे व्यवहार हे अधिकच्या आवकमुळे बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली होती. लाल कांद्याला अधिकची मागणी होती. पण अवघ्या दीड महिन्यात परस्थिती बदलली आहे. चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये 800 रुपये क्विंटल असा सरासरी दर मिळत आहे.
Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका
Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!
Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?