नाशिक: अवकाळीचा फटका बसल्यानं कांद्याच्या बाजार भाववाढीने सर्वसामान्यांना झटका दिला आहे. देशांतर्गत कांद्याच्या बाजार भावाचा भडका होत असल्याचं दिसून आलं आहे. कांद्याचे बाजार भाव चार हजार रुपयांच्या वर गेल्याने ग्राहकांसह केंद्र सरकारच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ग्राहकांनी यामुळे घाबरून जायचे कारण नसून येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची बंपर आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होईल. तो पर्यंत ग्राहकांना चढ्या भावाने कांदा खरेदी करावा लागेल. ( Onion rates increased in Nashik Lasalgaon Market)
ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे उशिरानं येणाऱ्या खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले. लासलगाव बाजार समितीत गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीसाठी येणाऱ्या लाल कांद्याची आवक 50 टक्क्यांनी घटल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे बाजार समितीत कांद्याचे सर्वसाधारण बाजार भाव चार हजार रुपयांच्या वर गेले.
कांद्याची दरवाढ होण्याची कारणं
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. निर्यात खुली असल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा घटला, याचा थेट परिणाम कांद्याचे बाजारभाव वाढण्यात झाला.
दिनांक | लाल कांदा दर | लाल कांदा आवक | उन्हाळ कांदा आवक | उन्हाळ कांदा दर |
---|---|---|---|---|
1 फेब्रुवारी | कमीतकमी 1151 रुपये , जास्तीतजास्त 3681 रुपये तर सर्वसाधारण 3400 रुपये | 27 हजार 927 क्विंटल | ||
6 फेब्रुवारी | कमीतकमी 1101 रुपये , जास्तीतजास्त 3130 रुपये तर सर्वसाधारण 2851 रुपये | 13 हजार 189 क्विंटल | ||
16 फेब्रुवारी | कमीतकमी 1500 रुपये , जास्तीतजास्त 4091 रुपये तर सर्वसाधारण 3600 रुपये | 11 हजार 465 क्विंटल | उन्हाळ कांदा 490 क्विंटल आवक | कमीतकमी 2001 रुपये , जास्तीतजास्त 4011 रुपये तर सर्वसाधारण 3500 रुपये |
17 फेब्रुवारी | कमीतकमी 1500 रुपये , जास्तीतजास्त 4500 रुपये तर सर्वसाधारण 3801 रुपये | 10 हजार 591क्विंटल | 1 हजार 910 क्विंटल | कमीतकमी 1000 रुपये , जास्तीतजास्त 4241 रुपये तर सर्वसाधारण 3570 रुपये |
20 फेब्रुवारी | कमीतकमी 1301 रुपये , जास्तीतजास्त 4300 रुपये तर सर्वसाधारण 4000 रुपये | 8 हजार 921 क्विंटल आवक | 973 क्विंटल आवक | कमीतकमी 1601 रुपये , जास्तीतजास्त 4112 रुपये तर सर्वसाधारण 3801 रुपये |
22 फेब्रुवारी | कमीतकमी 800 रुपये, जास्तीतजास्त 4375 रुपये तर सर्वसाधारण 3850 रुपये | 7 हजार 190 क्विंटल | 300 क्विंटल आवक | कमीतकमी 2000 रुपये , जास्तीतजास्त 4101 रुपये तर सर्वसाधारण 3700 रुपये (पहिल्या स्तरापर्यंत) |
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 8 लाख 40 हजार 555 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला कमीतकमी 800 रुपये , जास्तीतजास्त 2847 रुपये तर सर्वसाधारण 1939 रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला होता. यंदा मात्र कांद्याला चांगला बाजारभाव जरी असेल पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका लेट खरीप कांद्याला बसल्यामुळे कांद्याचे रोप वाया गेले होते. त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले याचा परिणाम होत लेट खरीप लाल कांद्याची आवक घटण्यामध्ये झाला. सन 2021 फेब्रुवारी 22 पर्यंतच्या 3 लाख 07 हजार 938 क्विंटल कांद्याची आवक झाली. याला कमीतकमी 800 रुपये , जास्तीतजास्त 4500 रुपये तर सर्वसाधारण 3516 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.
उन्हाळ कांद्याची आवक येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर वाढलेले कांद्याचे बाजारभाव स्थिर होत ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
केंद्रानं निर्बंध लादू नये, कांदा उत्पादकांची मागणी
कांद्याच्या बाजारभावात आज जरी वाढ दिसत असेल मात्र केंद्र सरकारने कुठलेही निर्णय घेत कांद्यावर निर्बंध लादू नये, अशी मागणी शेतकरी करत आहेत. ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी कांदा उत्पादक शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. गेल्या चार-पाच दिवसापूर्वी ही अवकाळी पावसामुळे ठीक-ठिकाणी उन्हाळ कांद्याला फटका बसल्याने कांद्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे आज जरी कांद्याचे बाजार भाव वाढलेले दिसत असेल मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून काही फायदा होत नसल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगतात.
Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचलाhttps://t.co/of77czgFMB#onion | #onionpricetoday | #onionrates | #lasalgaon | #nashik
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
संबंधित बातम्या
कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?
पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?
( Onion rates increased in Nashik Lasalgaon Market)