अवकाळी पावसानं कांदा शेतात सडला, उत्पादकांना कर्ज फेडण्याची चिंता, पंचनामा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| Updated on: May 05, 2023 | 1:22 PM

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश: भागात भात पिकाची शेती केली जाते. मात्र, पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ परिसरात पारंपरिक भात पिकाऐवजी कांद्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे सुध्दा शेतकरी आहेत.

अवकाळी पावसानं कांदा शेतात सडला, उत्पादकांना कर्ज फेडण्याची चिंता, पंचनामा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Onion farmers
Image Credit source: twitter
Follow us on

भंडारा : मागील आठवडाभरापासून भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अवकाळी पावसानं (unseasonal rain) जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळं धान उत्पादक शेतकरी असो किंवा पालेभाजी वा बागायती शेती करणारे शेतकरी, निसर्गाच्या दुष्टचक्रात सर्वच सापडले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) अक्षरशः हवालदिल झाले असून बांधातचं कांदा सडायला लागला तरी, प्रशासनाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेत बांधावर फिरकले नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आहे.

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश: भागात भात पिकाची शेती केली जाते. मात्र, पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ परिसरात पारंपरिक भात पिकाऐवजी कांद्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे सुध्दा शेतकरी आहेत. किंबहुना कांदा शेतीतून अनेकांनी स्वतःची मोठी आर्थिक भरारी घेतली आहे. या वर्षी सुमारे 60 हेक्टर पेक्षा अधिक भागात कांद्याची लागवड केली असून आता कांद्याची काढण्याचा हंगाम सुरू असताना सतत कोसळणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीसह पावसानं उसंत घेतली नाही अशी माहिती तरुण शेतकरी, चिराग काटेखाये यांनी दिली.

अवकाळी पावसात विक्रीयोग्य कांदा शेत बांधावर पावसात सापडला आणि आता अक्षरशः सडायला लागला आहे. 48 तासांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला असतानाही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहचलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा करण्याची विनवणी केली असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रवी खटारे, कांदा उत्पादक शेतकरी यांनी रोष व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

नांदेडमध्ये रात्री उशीरा सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पहाटे चार वाजेपर्यंत झोडपून काढल आहे. रात्रभर कोसळलेल्या या पावसाने नांदेडचे कमाल तापमान चोवीस अंशावर घसरल आहे. त्यामुळे वातावरणात गारठा तयार झालाय, सातत्याने बरसणाऱ्या या अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये साथीच्या आजारात देखील वाढ झाली आहे.