पालघर : यंदाचे वर्ष हे महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी असल्याची घोषणा यापूर्वीच (State Government) राज्य सरकराने केली आहे. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. (Development Corporation) महिला आर्थिक विकास महामंडळाने गोट बॅंक हा उपक्रम हाती घेतला आहे. (Goat) शेळीला गरिबाची गाय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गरीब शेतकरी महिलांसाठी ही योजना संजीवनी ठरत आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. आता महिला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या मंडळाने पालघर जिल्ह्यात गोट बॅंक सुरु केली आहे. महिला बचत गटांना यामुळे आर्थिक उभारी मिळणार असल्याचाव विश्वास व्यक्त केला जात आहे.
बॅंक म्हणले की पैशाची देवाण-घेवाण असेच चित्र उभा राहते पण महामंडळाची ही बॅंक वेगळी आहे. या बॅंकेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांमध्ये 1 गर्भार शेळी दिली जाते. पहिल्या येतातील 3 पिल्ले ही गोट बॅंकेला द्यावी लागणार आहेत. त्यानंतर मात्र शेळी आणि उत्पन्नावर पूर्णपणे महिलेचा अधिकार राहणार आहे. म्हणजेच शेळी पालनाच्या व्यवसयाची सुरवातच या बॅंकेच्या माध्यमातून करुन दिली जात आहे. एवढेच नाही तर शेळीच्या विम्यासह लसीकरणाचा खर्च देखील गोट बॅंकेवर राहणार आहे. त्यामुळे शेकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे.
अति गरीब महिलांच्या सक्षमीकरणाचा उद्देश समोर ठेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे. या शेळीपालनातून मिळणाऱ्या उत्पादनातून चलन तर फिरतेच पण महिलांना आपला एक व्यवसाय उभा करता येतो. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे व्यवस्थापन, महिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, उद्योजकीय विकास साधणे असा महिला विकास महामंडळाचा उद्देश असून गोट बॅंकेच्या माध्यमातून अनेक गरीब महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.
गोट बॅंकेचा विस्तार आता राज्यभर होत आहे. यापूर्वी अकोला जिल्ह्यात या बॅंकेची स्थापना झाली होती. गरीब शेतकरी महिलांच्या हाताला काम मिळावे हा त्यामागचा हेतू असून यामधील व्यवहारातही पारदर्शकता आहे. जिल्ह्यातील वाडा येथे ह्या बॅंकेची उभारणी झाली आहे. यावेळी आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जि.प.सदस्या भक्ती वलटे, सागर ठाकरे, अमोल पाटील हे उपस्थित होते.