निफाड – द्राक्षांच्या (Grapes) घडांवर काळी बुरशी निर्माण व्हायला लागल्यापासून शेतक-यांसमोर एक मोठं नवीन आर्थिक संकट उभं राहिल या भीतीने अनेक शेतकरी (nashik farmer) धास्तावले असल्याचे चित्र नाशिकमध्ये (nashik)पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी द्राक्षांच्या बागेची काळजी घ्यायला सुरूवात केली आहे. कारण आत्तापर्यंत द्राक्षांच्या बागांवरती खूप खर्च झाला आहे, तो खर्च नाही निघाला तर पुन्हा कर्ज बाजारी व्हायची वेळ येईल अशी शक्यता वाटत असल्याने अनेक शेतक-यांनी काळजी घ्यायला सुरूवात केली आहे. तयार झालेल्या द्राक्षांच्या बागांवरती धुके पडत असल्याने मोठा अर्थिक तोटा होऊ शकतो असं अनेक शेतक-यांना वाटतंय. कारण गेल्यावर्षी झालेल्या पावसाळ्यात योग्य प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे यंदाचं पीक एकदम जोमात आलं होतं. त्यामुळे हातातोंडाला आलेलं पीक वाया जाऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं असल्याचं अनेक शेतकरी म्हणतात.
या कारणामुळे द्राक्षांच्या पिकांवर परिणाम
कोरोनाच्या काळात मागच्या दोन वर्षाच्या काळात अनेकांना अर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तसेच शेतकरी सुध्दा अर्थिक संकटाला अजून तोंड देत आहेत. दोन वर्षात कोरोना असल्यामुळे त्यांना हव्या असलेल्या भावात पीक विकता आलेलं नाही. तसेच सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं दिसत असताना बुरशीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. तसेच सद्या पडणारं धुकं, वातावरणातला गारवा आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांच्या बागांवरती परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत कोणती उपाय योजना करावी या चिंतेत शेतकरी आहे.
बुरशी घालवण्यासाठी काय करावं ? या चिंतेत शेतकरी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून मातीमोल बाजार भावाने द्राक्षांची विक्री करण्याची वेळ निफाड तालुक्यासह इतर गावातील द्राक्ष उत्पादकांवर आली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने द्राक्षबागांवर फळधारणा चांगली झाली असताना अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यातून झुंज देत द्राक्ष बाग वाचवल्या, तर यंदाच्या थंडीच्या हंगामात किमान तापमानाचा पारा हा निफाड तालुक्यात गेल्या 25 दिवसांपासून चार ते सहा अंश सेल्सियस दरम्यान सातत्याने टिकून राहिला आहे. त्यामुळे फुगवनीला आलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने द्राक्ष बागेला ड्रीपद्वारे पाणी देणे बागेत शेकोट्या पेटवून धूर करत ऊब निर्माण करत द्राक्ष बाग वाचवल्या. मात्र आता द्राक्ष घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या बाजार भावावर परिणाम होणार असल्याने झालेला मोठा खर्चही भरून निघणार नसल्याची भीती निर्माण झाल्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा मोठा प्रश्न आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर उभा राहील आहे.