नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्यामुळे भारत (India) आणि शेजारच्या देशांमध्ये प्रचंड गर्मी (temprature) असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गर्मी इतकी वाढली आहे की, लोक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे वीज सुध्दा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचं पाहायला मिळालं आहे. पाकिस्तानमधील सामान्य जनता सध्या अधिक अडचणीत आहे. त्यांचा कुणीचं तिथ वाली नसल्याचं ऐकायला मिळत आहे. तिथली महागाई इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाचं जगणं अवघडं झालं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची (latest pakistan news in marathi) लोकं उपाय शोधत आहेत. लाईट नसल्यामुळं तिथल्या एका व्यक्तीनं जुगाड केला आहे.
लोकांना सरकार काहीचं करणार नसल्याचं माहित झाल्यापासून त्यांनी जुगाड करायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी लाईट कपात केली जात आहे. तिथल्या लोकांना कसल्याची मेहनती शिवाय हवा मिळत आहे. त्या झोपले तरी हवा मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुध्दा आनंद होईल. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे.
त्या व्हिडीओत तुम्हाला तिथल्या परिसरात खाट लावल्याच्या दिसतील. त्यांच्या मधोमध एक गाढव फिरत आहे. लोकांनी लाकूड आणि गाढवाच्या मदतीनं एक पंखा तयार केला आहे. त्यामध्ये गाढव गोल-गोल फिरत आहे. त्यावेळी पंखा सुध्दा गोल फिरत आहे. लोक तिथं बसून आणि झोपून त्याची मजा घेत आहेत. तुम्ही अशा पध्दतीचा पंखा या आगोदर कधीचं पाहिला नसेल.
#RenewableEnergy @ParveenKaswan Guess the country?#environment #GlobalWarming pic.twitter.com/jkiZ4IRLkm
— Devendra Singh Kaswa 🇮🇳 (@dskaswa) September 5, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर @dskaswa नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ६ हजार लोकांनी पाहिला आहे, लोकं त्या व्हिडीओ पाहून भन्नाट कमेंट करीत आहेत.