तुरीचा काढणीपूर्वीच झाला खराटा, काय आहे उपापयोजना ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

| Updated on: Nov 26, 2021 | 11:19 AM

जिल्ह्यात कोरडवाहू तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, खरिपातील सर्वच पिकांना यंदा पेरणीपासूनच धोका राहिलेला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीच आहे पण आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे.

तुरीचा काढणीपूर्वीच झाला खराटा, काय आहे उपापयोजना ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

वाशिम : जिल्ह्यात कोरडवाहू तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, खरिपातील सर्वच पिकांना यंदा पेरणीपासूनच धोका राहिलेला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीच आहे पण आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि (Change in environment) ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर ( pest infestation on tur) मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महागडी औषधे घेऊन फवारणी केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

तूर हे खरिपातील शेवटचे पीक आहे. मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा या पिकावर परिणाम झाला नव्हता पण सध्या हे पिक फुलोऱ्यात आहे. यातच मररोगाचे प्रमाण वाढत असल्याने वाई वरला परिसरात फुलगळती होत आहे. याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत.

आता दुरगामी उपाययोजनाच गरजेची

वातावरणातील बदलामुळे किड, रोगराईचा प्रादुर्भाव हा दोन्ही हंगामातील पिकांवर राहणार आहे. त्यामुळे सातत्याने औषध फवारणीवरही मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्ची करावा लागत आहे. आता शेतकऱ्यांनी तात्पूरती उपाययोजना न करता तुरीची पेरणी करताना बियाणांमध्ये बदल करावा, बीडीन 711 व बीडीन 716 या मररोग प्रतिबंधक जातीच्या वाणाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. फेरपालट पध्दतीने पीक घ्यावे. पेरणीपुर्व थायरम अधिक काबॅक्सिन पावर 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणाता बीजप्रक्रिया करावी. तूर पिकांमध्ये ट्रीकोडर्मा 4 किलो प्रति एकरी 200 लिटर पाण्यातू फवारणी करावी, तूरीच्या खोडावर फियटोपथोरा बलाईटचे काळे ठिपके दिसताच रेडोमिल गोल्ड 25 ग्रॅम प्रति लिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.

वातावरणात कायम बदल

यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच वातावरणातील बदलाचा फटका पिकांना बसलेला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण शेतकऱ्यांना अधिकचा पैसाही खर्ची करावा लागलेला आहे. आता या वातावरणातील बदलाच्या समस्येला सातत्याने सामोरे जावेच लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करतानाच विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बीजप्रक्रिया हा महत्वाचा भाग आहे. ती पूर्ण करुनच पेरणी केली तर फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापुर्वी सोयाबीन या मुख्य पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला होता तर आता तुरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी वाई-वारला परिसरातील शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, काय होणार नेमका परिणाम?

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!