जालना: (Rabi Season) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र विक्रमी वाढले आहे तर दुसरीकडे कडधान्यावर भर दिला आहे. शिवाय शेतजमिनीचा योग्य वापर आणि पाण्याचा सदउपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनी (Maize Crop) मक्याची लागवड केली आहे. (Marathwada) मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मकाचे अधिकचे उत्पादन घेतले जात आहे. विशेषत: भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये पेरणीचा टक्का हा वाढलेला आहे. असे असले तरी वाढत्या वातावरणामुळे आता मका पिकावर मर आणि कोरडी मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होणार आहेच पण चारा पीक म्हणूनही त्याचा उपयोग होतो की नाही याबाबत शंका आहे.
ज्या जमिन क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणी 5 ट्रायकोडर्मा प्रति हेक्टरी 100 किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे लागणार आहे. मात्र, याचे प्रमाण वाढले तरी कोणताही विपरीत परिणाम न होता जैविक बुरशी अधिक परिणामकारक ठरते. मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक 1 टक्का या प्रमाणात फवारावी किंवा ठिबकद्वारेही देता येणार आहे. जसे की कार्बेन्डसीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.
ज्वारीला पर्याय म्हणून समोर आलेले पीक म्हणजे मका. येथील पोषक वातावरणामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन आणि योग्य बाजारभाव मिळाल्याने क्षेत्र हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढले आहे. जिलह्यातील 5 तालुक्यांमध्ये विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. मात्र, पीक जोमात असतानाच मकावर मर व कोरडी मूळकूज आढळून आली आहे. त्यामुळेच बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रातील संशोधकांनी या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
ढगाळ वातावरण व पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी महिनाभर कोणतेही पीक न घेता शेतजमिन तापविणे महत्वाचे आहे. त्यामुळे बुरशीजन्य अंड्याचा बंदोबस्त होणार आहे. शिवाय रोगांना बळी पडणारे संकरित वाण टाकणे गरजेचे असल्याचे कृषीतज्ञ शीतल चव्हाण यांनी सांगितले आहे.
सोयाबीनची साठवणूक अन् हरभऱ्याची विक्री, काय स्थिती आहे खरेदी केंद्रावरची?
Hingoli : वसमतमध्ये हळद संशोधन केंद्राची होणार उभारणी, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?
सोयापेंड, सोयाबीन नंतर पोल्ट्रीधारकांचे लक्ष आता गहू – तांदळावर, काय आहे नेमके कारण?