PM Kisan : शेतकऱ्यांनो, पटकन करा ही कामे, नाही तर खात्यात येणार नाही 14 वा हप्ता

| Updated on: Jul 15, 2023 | 7:57 AM

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता लवकरच येणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता लकरच येईल. पण त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तरच योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल.

PM Kisan : शेतकऱ्यांनो, पटकन करा ही कामे, नाही तर खात्यात येणार नाही 14 वा हप्ता
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan) अत्यंत लोकप्रिय योजना आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 13 हप्ते जारी केले आहे. उत्तर भारत सोडला तर देशातील इतर भागात अजूनही पेरणीची लगबग सुरु झाली नाही. जुलै महिना अर्ध्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी (Farmer) केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. आता या योजनेतील (Central Scheme) शेतकऱ्यांना लवकर धनलाभ होणार आहे. या योजनेतील 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.

इतक्या शेतकऱ्यांना लाभ
केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्याही तारखेची घोषणा केलेली नाही. पीएम मोदी पुढील महिन्याच्या आत 14 वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यावेळी देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा 14 वा हप्ता जमा करणार आहे.

ई-केवायसी
या योजनेतील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसान मोबाईल ॲप आणले आहे. हे मोबाईल ॲप सुरु झाल्याने बोगस लाभार्थ्यांना चाप बसेल. त्यासाठी या ॲपमध्ये फेस ऑथेन्टिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञाना आधारे शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी अगदी सहज करता येईल. त्यांना वन टाईम पासवर्ड आणि फिंगरप्रिंटची गरज राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

आधार कार्डशी कर कनेक्ट
या योजनेतील हप्ता चुकू नये यासाठी एनपीसीआय संबंधीत बँक खात्याचे केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ते नसेल तर खात्यात रक्कम येणार नाही. त्यामुळे तुमच्या खात्याची ईकेवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार आणि एनपीसीआयची जोडणी, लिंकिंग करणे आवश्यक आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन खाते उघडा
केंद्र सरकारने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन खाते उघडणे सोपे केले आहे. पोस्ट बँक खात्यात आधार आणि एनपीसीआय जोडणे सोपे आहे. त्यामुळे इतरत्र तुमच्या खात्याला अडचण येत असेल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या योजनेचा 14 वा हप्ता जमा होईल.

बँक खाते एनपीसीआयशी लिंकिंग तपासा
बँक खाते एनपीसीआयशी लिंकिंग आहे की नाही हे तपासण्यासाठी सोपी पद्धत आहे. सर्वात अगोदर https://resident.uidai.gov.in/bank-mapper या लिंकवर जावे लागेल. याठिकाणी तुमचे सर्व तपशील यामध्ये भरा. नवीन बँक खात्याची माहिती द्या.

या दिवशी जमा होईल 14वा हप्ता
केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील 13 हप्ते जमा केले आहेत. देशभरातील शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. 14वा हप्ता कधी जमा होईल, याची त्यांना प्रतिक्षा लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करणार आहे. या योजनेतील निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात येईल. केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.