PM Kisan : या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ; कारण तरी काय?

| Updated on: Jan 10, 2025 | 2:12 PM

PM Kisan Scheme 19th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर तुम्ही पण लाभार्थी असाल तर अगोदर तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा, नाहीतर योजनेपासून वंचित राहाल.

PM Kisan : या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ; कारण तरी काय?
पीएम किसान योजना
Follow us on

केंद्र सरकार दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत शेतकर्‍यांना देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत DBT, थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येते. शेतकर्‍यांच्या खात्यात दर चार महिन्याला 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता शेतकर्‍यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. त्यातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. या नवीन गाईडलाईन्समुळे काही शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

हे शेतकरी राहू शकतात वंचित

जर तुम्ही सरकारच्या गाईडलाईन्सचे योग्य पालन केले नाही तर 19 वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

या शेतकर्‍यांना बसणार फटका

जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर त्याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जिल्हा कृषी कार्यालयाकडून, भूमी अभिलेखाची पडताळणी करून घ्या. नाहीतर 19 व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहाल.

जर तुम्ही अर्ज भरताना काही चूक केली असेल अथवा त्रुटी ठेवली असेल, चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला असेल तर तुमचा हप्ता थांबवल्या जाईल.

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हप्ता अटकू शकतो. या चुकांमुळे तुमचा हप्ता जमा होणार नाही. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा नजकीच्या ऑनलाईन सेवा केंद्रात माहिती अद्ययावत करा.

असे करा eKYC

ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)

बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता

फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.

या क्रमांकावर करा कॉल

पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606