नवी दिल्ली | 24 February 2024 : दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान चांगली बातमी येऊन धडकली आहे देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल. त्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याविषयी आनंदवार्ता मिळाली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये मिळतात. जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना पण लॉटरी लागणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याविषयी एक महत्वाची अपडेट दिली आहे.
पीएम किसानचा 16 वा हप्ता कधी जमा होणार ?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता 28 फेब्रुवारी, 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे. या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ओटीपी आधारे ई-केवायसी, पीएम किसान पोर्टलवर करता येऊ शकते. या बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधता येईल.
आतापर्यंत खात्यात 2.8 लाख कोटी
मोदी सरकारने पहिल्या कालावधीत 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. ही योजनेची गोड फळं मोदी सरकारने चाखली. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले.
योजनेसाठी असा करा अर्ज
असे करा eKYC
पैसा आला की नाही खात्यात?